Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा उबाठा शिवसेनेच्या वतीने रामरक्षा महाआरती - उत्स्फूर्त प्रतिसाद.🟣 दाभील येथे मोटर...

आजरा उबाठा शिवसेनेच्या वतीने रामरक्षा महाआरती – उत्स्फूर्त प्रतिसाद.🟣 दाभील येथे मोटर दुरुस्ती करताना वीजेचा शॉक लागून 59 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू.🟣आजऱ्यात बारमध्ये वाढदिवस पार्टीदरम्यान मारहाण – 4 जणांवर गुन्हा🟣 पार्किंगच्या वादातून बारबाहेर तुफान मारहाण – आजऱ्यात 4 जणांवर गुन्हा

🛑आजरा उबाठा शिवसेनेच्या वतीने रामरक्षा महाआरती – उत्स्फूर्त प्रतिसाद.
🟣 दाभील येथे मोटर दुरुस्ती करताना वीजेचा शॉक लागून 59 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू.
🟣आजऱ्यात बारमध्ये वाढदिवस पार्टीदरम्यान मारहाण – 4 जणांवर गुन्हा
🟣 पार्किंगच्या वादातून बारबाहेर तुफान मारहाण – आजऱ्यात 4 जणांवर गुन्हा

🛑आजरा उबाठा शिवसेनेच्या वतीने रामरक्षा महाआरती – उत्स्फूर्त प्रतिसाद.

आजरा – प्रतिनिधी

आजरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभू श्रीराम मंदिरातील दानपेटीच्या चोरी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महाआरतीचे नेतृत्व जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
महाआरतीच्या वेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, “धर्मस्थळाची पवित्रता भंग करून दानपेटीची चोरी करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. अशा घटनांमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.”
उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी सांगितले की, “श्रीराम मंदिर ही आस्था व श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा ठिकाणी चोरी होणे हे निंदनीय आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.”
तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले, “जर ८ दिवसांच्या आत चोरांना अटक केली नाही तर उबाठा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
महाआरतीनंतर सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे रामरक्षा म्हटली आणि परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रार्थना केली. संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.
या महाआरतीला महिला आघाडी, युवासेना व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

🟣 दाभील येथे मोटर दुरुस्ती करताना वीजेचा शॉक लागून 59 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू.

आजरा – प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील दाभील येथे शेतातील मोटर दुरुस्ती करत असताना वीजेचा शॉक लागून 59 वर्षीय शेतकरी श्रावण गणपती वाजे यांचा दि. ११ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण वाजे हे दाभील ता. आजरा येथील झीत्रे यांचे “झोटींग माळ” नावाच्या शेतजमीन गट नं. 148 मध्ये असलेल्या विहिरीची मोटर दुरुस्त करत होते. भात शेतीला पाणी लावण्यासाठी ते मोटर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक त्यांना शॉक लागला.

घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी नंदकुमार आनंदराव वाजे वय 52 वर्ष, रा. दाभील यांनी आजरा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास सपोनी सरवदे यांच्या आदेशानुसार पो.हे.कॉ. 2157 तडवी हे करत आहेत.

🟣आजऱ्यात बारमध्ये वाढदिवस पार्टीदरम्यान मारहाण – 4 जणांवर गुन्हा

आजरा – प्रतिनिधी

आजरा येथील आमराई गल्ली परिसरातील सुमासस बार मध्ये काल मंगळवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या भांडणाचे पर्यवसान मारामारीत झाले. यात चौघे जखमी झाले आहेत. शैलेश कृष्णा दारुटे रा. आवंडी वसाहत आजरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय शामराव पाटील रा. देवर्डे, कुलदीप मधुकर कैसरकर रा. साळगाव, अमर सुरेश फळकर रा. साळगाव व दीपक शिवाजी सुतार रा. शिवाजीनगर आजरा या चौघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा रजि. नं. 185/2026 दाखल झाला आहे. या मारामारीत फिर्यादी शैलेश दारुटे, अदित्य वंजारी रा. आमराई गल्ली, मेहबूब शेख रा. भारतनगर आजरा व आरोपी संजय पाटील जखमी झाले आहेत.
पुढील तपास पो.हे.कॉ. शिकलगार हे करत आहेत.

🟣 पार्किंगच्या वादातून बारबाहेर तुफान मारहाण – आजऱ्यात 4 जणांवर गुन्हा

आजरा – प्रतिनिधी

आजरा येथील बार च्या मागील बाजूस पार्किंगवरून झालेल्या वादातून 3 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली.
संजय शामराव पाटील रा. देवर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य वंजारी रा. आमराई गल्ली, शैलेश दारुटे रा. आवंडी वसाहत व मैनुद्दीन शेख रा. भारतनगर यांना लाथाबुक्क्यांनी मारून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले.
सोडवायला गेलेल्या 3 जणांनाही मारहाण झाली. या प्रकरणी 4 जणांविरोधात आजरा पोलिसात गु.र.नं. 186/2026 दाखल.
पुढील तपास पो.हे.कॉ. बेनके करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.