Homeनागपूर - विदर्भआजरा शहरातील एच.पी. गॅस ग्राहकांची मोठी गैरसोय - ( तहसीलदार समीर माने...

आजरा शहरातील एच.पी. गॅस ग्राहकांची मोठी गैरसोय – ( तहसीलदार समीर माने यांना निवेदन – बुकिंगनंतर १० ते १२ दिवसांनी सिलिंडर.)

आजरा शहरातील एच.पी. गॅस ग्राहकांची मोठी गैरसोय – ( तहसीलदार समीर माने यांना निवेदन – बुकिंगनंतर १० ते १२ दिवसांनी सिलिंडर.)

आजरा – प्रतिनिधी.

आजरा शहरातील एच.पी. गॅस ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर मिळण्यासाठी १० ते १२ दिवस वाट पाहावी लागत आहे. एकूण ५० ते ६० दिवसांचा कालावधी लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार व लहान मुले असलेल्या कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात आजरा येथील नागरिकांनी तहसीलदार समीर माने यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.आजरा हे तालुक्याचे मुख्यालय व नगरपंचायत क्षेत्र असताना, येथील ग्राहकांना गवसे येथील सौजन्या गॅस एजन्सीमार्फत पुरवठा केला जातो. एजन्सी ग्रामीण भागात असल्याने शहरातील ग्राहकांनाही ग्रामीण भागाचे निकष लावले जात आहेत.
१ ) दीर्घ प्रतिक्षा : एक सिलिंडर संपल्यावर पुढील बुकिंगसाठी ४५ दिवसांचा कालावधी आणि त्यानंतर वितरणासाठी पुन्हा १० ते १२ दिवसांचा विलंब होतो. त्यामुळे ग्राहकाला ५० ते ६० दिवस वाट पाहावी लागते.
२) घरपोच सेवा नाही*: वेळेत घरपोच वितरण न झाल्याने ग्राहकांना स्वतः वितरण केंद्रावर जाऊन सिलिंडर आणावा लागतो. पर्यायी इंधन वापरावे लागत असल्याने आर्थिक भारही वाढला आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या.
१) शहरी निकष लागू करावा: आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व एच.पी. गॅस ग्राहकांना शहरी ग्राहक म्हणून गृहीत धरून गॅस बुकिंगचा कालावधी २५ दिवसांचा करण्यात यावा. २) लवकर घरपोच सेवा: सौजन्या गॅस एजन्सीने शहरातील ग्राहकांना बुकिंगनंतर दुसऱ्याच दिवशी किंवा शक्य तितक्या लवकर घरपोच सिलिंडर उपलब्ध करून द्यावा.
३) विलंब थांबवावा :- बुकिंगनंतर सिलिंडर वितरणासाठी होणारा १० ते १२ दिवसांचा अनावश्यक विलंब तातडीने थांबवावा.
४) नियमित वितरण व्यवस्था*: ग्राहकांना वारंवार केंद्रावर जावे लागू नये यासाठी प्रभावी व नियमित घरपोच वितरण व्यवस्था करावी.
५) तक्रारींचे निवारण: गॅस वितरण व्यवस्थेवर प्रशासनाने नियंत्रण ठेवून ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे.
तसेच की, “आजरा शहरातील ग्राहकांचा पत्ता नगरपंचायत हद्दीत असताना केवळ गॅस एजन्सी ग्रामीण भागात आहे म्हणून त्यांना ग्रामीण ग्राहकांचे निकष लागू करणे योग्य नाही. शहरातील ग्राहकांना त्यांच्या वास्तव्यानुसार योग्य सुविधा व वेळेत घरपोच सेवा मिळणे आवश्यक आहे.”

तरी सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर
जावेद पठाण, अबुसहीद मांगावकर, शरीफ खेडेकर
सुशील लतिफ, गौस मुल्ला आदिच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.