खासदार अरविंद सावंत,आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी करण्यात आली नियुक्ती.
( शिवसेनेत फूट पडल्यापासून आमदार भास्कर जाधव हे आक्रमकपणे उद्धव ठाकरेंची बाजू मांडत आहेत. भास्कर जाधव यांचा हा आक्रमकपणा विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळाला. असं सध्याचं चित्र आहे. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान शनिवारी सकाळी एक वेगळी घटना समोर आली. ( शिवसेनेचे खमके शिलेदार भास्कर जाधव यांनी भाजपचे बडे नेते आणि राज्याचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या गाडीतून प्रवास केला.आणी राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर अचानक शनिवारी दुपारी भास्कर जाधवांना शिवसेनेत बढती देऊन शिवसेना नेतेपदी जाधव यांची निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. )
मुंबई. – प्रतिनिधी.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.कोकणातूनचं राज्यात व देशात शिवसेना फोफावली त्यामुळे केंदात व महाराष्ट्रात युती सरकार सत्तेत आले.येवढेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले.
तर गेली अनेक दक्षके मुंबईतील सर्वात मोठी असलेल्या महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे.तर अनेक महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहेत.हे सर्व शिवसेनेला मिळाले ते फक्त कोकणामुळेच… मात्र अलिकडेच शिवसेनेत दुफळी माजली. त्यामुळे कोकणचे शिलेदार उदय सामंत,दिपक केसरकर भरत गोगावले यासह कोकणासह ठाणे मुंबईतील अनेक शिवसेनेचे शिलेदार शिंदे गटात दाखल झाले.तरीपण कोकणातील शिवसेनेचा गड भास्कर जाधव,राजन साळवी व वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्या मदतीने अबाधित राखला.मात्र कोकणातील हे प्रमाणिक शिलेदार यांनी गुवाहाटी ऑपरेशनचे प्रमुख सूत्रधार भाजप राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे विश्वासू तसेच आताच्या शिंदे सरकारातील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत काहींनी बंद दरवाजा आड तर काहीनी विकास कामे दाखवत या ना त्या कारणाने मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने,कै.बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांचे शिलेदार कोकणच्या गडाला खिंडार पाडून शिवसेनेचा कोकणातील गड भाजप आपल्या ताब्यात आणण्यासाठी गुवाहाटीतील नवे ऑपरेशन कोकणात घडणार का?अशीच चर्चा कोकणातील जनतेतून व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका भाजपच्या ताब्यात येण्यासाठी भाजपने रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्यातून कोकणच्या उर्वरीत शिलेदारांना आपल्यालाकडे वळविण्याचा नवा फंडा आखलेला दिसतो.कारण भाजप-शिंदे सरकारचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कोकण दौऱ्यात सेनेच्या शिलेदाराच्या गाठीभेटी नंतर तात्काळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस निघालेल्या पत्रकाद्वारे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले आहे.
ऑपरेशन गुवाहाटी घडण्या मागे सामान्य शिवसैनिकांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट न मिळणे. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या काही आमदारांना मंत्री पदावर वर्णी न लावणे व विकास निधीतील दुजाभाव याचा एकत्रित परिणाम म्हणून गुवाहाटी ऑपरेशन घडले. मात्र कोकणातील आमदारांना नेतेपद भाजप मंत्र्यांच्या गाठीभेटी नंतर दिले जाते. त्यामुळे आजही सेनाभवन अलबेल असल्याचे दिसते.
खासदार अरविंद सावंत,आमदार भास्कर जाधवांना बढती.- तर शिवसेनेच्या सचिवपदी पराग डाके
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या पुन्हा नव्याने पक्षबांधणी करीत आहेत.उद्धव ठाकरेंकडून राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या निवडीवरुन उद्धव ठाकरे आता निष्ठावंतांची विशेष काळजी घेत असल्याचे दिसत आहे.
खासदार अरविंद सावंत,आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी तर पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे शिवसेनेच्या पत्रकात म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या नेत्यांना आपल्या बाजुला वळवून आपलाच गट खरी शिवसेना असल्याचे शिंदेंनी दाखवले आहे.या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेतील निष्ठावंतांची विशेष काळजी घेत आहे.
शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची पक्षामध्ये आता बढती देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाशी आक्रमकपणे संघर्ष करण्यास शिवसेना मैदानात उतरणार आहे
