व्यंकटरावमध्ये कै.अमृतराव काकांची पुण्यतिथी साजरी.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे संस्थापक चेअरमन कै. अमृतरावजी (काका) देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेतील त्यांच्या तैलचित्र प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे शुभहस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष श्री अण्णासो पाटील, सचिव एस पी कांबळे, प्रशालेचे माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई, माजी प्राचार्य श्री शिवाजी गुरव, प्राचार्य एस जी खोराटे, पर्यवेक्षक श्री एस एन पाटील, सांस्कृतिक विभागातील प्रमुख व सर्व सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी श्री. देसाई यांनी आपल्या मनोगतातून कै.अमृतरावजी काकांच्या जीवनातील काही प्रसंग कथन करुन त्यांच्या अतुलनीय व्यक्तिमत्त्वाचा साक्षात्कार घडविला ..तालुक्याच्या विकासातील काकांचे योगदान व त्यांनी निर्माण केलेल्या विविध सेवा संस्था या आजही समाजासमोर आदर्शवत आहेत. खेडोपाड्यातील गोरगरीब व बहुजन समाजातील मुला मुलींनी शिक्षण घ्यावे म्हणून आजऱ्यामध्ये संस्थान काळात २९३२ सली आजरा महाल शिक्षण मंडळ अंतर्गत व्यंकटराव हायस्कूल सुरू केले. तसेच भादवण हायस्कूल, सिरसंगी येथे हायस्कूल काढले व आजरा तालुक्यातील खेडोपाड्यामधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी काकांबद्दल व त्यांच्या सहवासात घालवलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. काकांची न्यायनिवाडा करण्याची पद्धत, त्यांच्यामध्ये असणारी सर्वधर्म सहिष्णुता, तसेच विविध धर्माबद्दल त्यांच्या मनात असणारे अपार प्रेम याबद्दल सांगितले.
