Homeकोंकण - ठाणेमडिलगे ग्रामपंचायत केली मनसेची दिशाभूल - निषेधार्थ. - पंचायत समितीवर मनसेचा मोर्चा....

मडिलगे ग्रामपंचायत केली मनसेची दिशाभूल – निषेधार्थ. – पंचायत समितीवर मनसेचा मोर्चा. ( दिशाभूल करणाऱ्या सरपंच – ग्रामसेवकवर फौजदारी गुन्हा दाखल करा. – अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही. ता. अध्यक्ष. – अनिल निऊगरे.)

मडिलगे ग्रामपंचायत केली मनसेची दिशाभूल – निषेधार्थ. – पंचायत समितीवर मनसेचा मोर्चा. ( दिशाभूल करणाऱ्या सरपंच – ग्रामसेवकवर फौजदारी गुन्हा दाखल करा. – अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही. ता. अध्यक्ष. – अनिल निऊगरे.)

आजरा. – प्रतिनिधी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका यांच्या वतीने दि.२६ रोजी ग्रामपंचायत मडिगेरी ता. आजरा येथे चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत तक्रारी संदर्भात मोर्चाने जाऊन पंचायत समिती आजरा कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. या नळपाणी योजनेसाठी गावातील रस्ते खुदाई करून एक महिना उलटला तरीही खुदाई केलेले चरी व्यवस्थित न भरल्यामुळे गावातील नागरिकांच्या गैरसोय झालेली आहे. याबाबत दि १२/८/२०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावर आजरा मनसे वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. व ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक व सरपंच यांना धारेवर धरण्यात आले होते. सदरच्या मोर्चाला उत्तर देताना सरपंच व ग्रामसेवक यांनी मोर्चात सामील झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गावात खुदाई करून लोकांची गैरसोय करणाऱ्या ठेकेदारावर आजच फौजदारी गुन्हा ग्रामपंचायत वतीने नोंद करू अशी लेखी खोटे आश्वासन देण्यात आले या निसर्गात आम्ही दि १८/८/२०२२ रोजी पंचायत समिती अधिकारी यांना संबंधित ठेकेदारावर व खोटे आश्वासन देणारे सरपंच ग्रामसेवक यांच्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दि. २६/८/२०२२रोजी आपल्या कार्यालयास आंदोलन करण्यात येईल याबाबतचे निवेदन देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने पंचायत समिती आजरा यांच्याकडून संबंधित कोणती कारवाई करण्यात आली नाही. म्हणून पंचायत समिती आजरा या ठिकाणी आज २६ रोजी मनसे आजरा तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे यांनी संमधीत अधिकारी ग्रामसेवक कंत्राटदार यांच्याध्ये मिलिभगत असल्यामुळे एकमेकांना वाचण्याचे काम चालू असल्याचा आरोप केला. जिल्हाउपाध्यक्ष सुधीर सुपल यांनी जनसामाने लोकांच्या जीवाची खेळणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाईक झाल्यास एकालाही अधिकाराला खुर्चीत बसू देणार नाही. असा इशारा दिला. त्यावेळी तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनी प्रशासकीय अधिकारी यांना धरून इथून पुढे कोणालाही ग्रामपंचायत बाबतीत अशा खोट्या गोष्टी घालू नये असे समजले यावेळी तालुका तालुका सचिव चंद्रकांत सांबरेकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश कांबळे कामगार सेना अध्यक्ष विश्वास ळळसकर सहकार सेना म्हकांळी चौगुले, शहराध्यक्ष कुमार कांबळे विभाग अध्यक्ष सुनील पाटील, विभाग अध्यक्ष वाहतूक सेना वसंत घाटगे, प्रदीप पाटील, अरुण देसाई, परशुराम पोतणीस तालुक्यातील सर्व शाखेचे पदाधिकारी शाखाध्यक्ष उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.