एम.सी.एल कंपनीच्या स्थापनेला झाली दहा वर्षे पूर्ण. – या निमित्ताने आजरा समृद्धी कंपनीच्या वतीने केला वाढदिवस उत्साहात साजरा.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीच्या वतीने दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी. MCL कंपनीचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. MCL कंपनीच्या स्थापनेला दहा वर्ष पूर्ण झाली असून. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विचारानुसार भारतजर महासत्ता बनायचा असेल इंधनामध्ये भारताला स्वयंपूर्ण बनावे लागेल. आणि ही क्रांती भारतातील ७०% शेतकरी असणाऱ्या वर्गाला सोबत घेऊन करावी लागेल. या प्रेरणेतून डॉ. श्याम शिवाजी घोलप सर, सायंटिस्ट प्राची ढोले मॅडम, लवेश जाधव सर, या प्रमुख मंडळींनी एम.सी.एल या कंपनीची स्थापना केली मंगळवार दि ९ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली. भारतातल्या ७५० तालुक्यात लवकरच या तालुक्यात कंपनीच्या माध्यमातून युनिट चालू करण्यात येत आहेत. देशातील ही अभुतपूर्व इंधन क्रांती असेल या आनंदी वाढदिवसानिमित्त आजरा जि. कोल्हापूर येथील आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीच्या वतीने कंपनी कार्यालयात मंगळवार रोजी स. ११ वा. महीला ग्राम उद्योजक जयश्री कांबळे, निता बोलके यांच्या हस्ते.

केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीचे लि. आजराचे संचालक नारायण मुरुकटे, संभाजी जाधव, रामचंद्र मुरुकटे तसेच ग्राम उद्योजक उत्तम केसरकर हारुर, इजि. रामचंद्र कटाळे हालेवाडी, सोपान तानवडे देवर्डे, सौ. जयश्री कांबळे निगुडगे, निता बोलके वेळवट्टी, शंकर काडगळ आर्दाळ, कल्लेश्वर संकपाळ वडकशिवाले, उदय सरदेसाई चितळे, तसेच सर्व ग्राम उद्योजक, कार्यालय स्टाप प्राजक्ता गिलबिले, अर्चना सुतार, जितेंद्र खवरे सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक श्री नारायण मुरुकटे यांनी मानले.
