२०२२ चा “जैव इंधन दिवस” १० ऑगस्टला मुंबईत होणार मोठ्या उत्साहात साजरा. – डॉ. श्याम घोलप. – कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका टॉप टेन मध्ये.
आजरा – प्रतिनिधी.
जागतिक बायोफ्युअल ‘डे’ म्हणजे “जैव झंधन दिवस” सर्व जगभर साजरा केला जातो. परंतु १० ऑगस्ट २०२२ रोजी भारतामध्ये मुंबईत सहार सेव्हन स्टार या पंचतारांकित हॉटेलमध्ये एम. सी. एल कंपनीचे डॉ. श्याम शिवाजी घोलप, व टिम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून जगातील सर्वात मोठा “इंधनक्रांतीचा” कार्यक्रम होणार आहे.
भारतातील २२५ तालुक्यातील एम. पी. ओनर्स ( उद्योजक ) उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील आजरा, गडहिंग्लज, कागल, भुदरगड या उद्योजकांचा सहभाग असणार आहे. या एम.सी.एल कंपनीच्या माध्यमातून एक तालुक्याला ५० करोड अशी ६०० करोड रुपयाची गुंतवणूक या कंपनीच्या माध्यमातून होऊन सोबत शेतकऱ्यांच्या हाताला काम विकास होणार आहे.
या समारंभासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून आजरा – बाळासाहेब वाघमारे, गडहिंग्लज. – सुधीर फडके कागल किरण घुगरे, भुदरगड. – रोहित भांडवलकर या कंपनीचे प्रमुख या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई येथे १० ऑगस्ट २०२२ रोजी सहारा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये होणाऱ्या जागतिक जैव इंधन दिवस WORLD BIOFUELS DAY दिवसाच्या कार्यक्रमात भारतील सर्व ए.पी.ओ ( उद्योजक )उपस्थित दरवर्षी मोठ्या उत्साहाने जगभरात जागतिक जैव इंधन दिवस साजरा केला जातो. त्याप्रमाणे भारतात सर्वात मोठ्या उत्साहाने हा दिवस मुंबई स्थित मीरा क्लीन फ्यूल्स लिमिटेड कंपनी (MCL मुंबई) गेल्या दहा वर्षांपासून हा दिवस साजरा करीत आहे. भारताला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर करण्या करिता या कंपनी मार्फत मोठ्या प्रमाणात २०३० पर्यंत हे मिशन राबवण्यासाठी ग्रामीण पातळीवर या कार्यक्रमात देशभरातून दोनशे चे वर उद्दोजक सहभागी होत असून या कार्यक्रमा निमित्त प्रकल्प उभारणी साठी MCL सोबत सामज्जस करार होत असून जवळपास दोनशे कोटींची गुंतवणूक करणार असून त्यामध्यमातून प्रकल्पात तयार होणाऱ्या उत्पादना मुळे कोल्हापूर जिल्हा प्रदूषण मुक्त होऊन ,बेरोजगारी मुक्त सुद्धा होईल ,प्रत्येक तालुक्यातील गाव खेड्या मध्ये शेतकऱ्याच शेतातील नेपियर गावात म्हणजेच हत्ती गवत लागवडीला देऊन हमी भावाने विकत घेण्यासाठी शेतकऱ्या सोबत करार करून त्यांना प्रतीमहा एक एकरी /२० हजार रुपये एवढे उत्पन्न देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच प्रकल्प च्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात सुरवातीला पाचशे ते हजार लोकांना रोजगार प्राप्त होतील कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ग्रामपंचायत व एक नगरपरिषद स्तरावर ग्राम उद्दोजक नियुक्त केले आहेत. त्यांना गाव पातळीवर चांगले उत्पन्न देऊन यांच्या माध्यमातून गाव सुजलाम सुफलाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पात तयार होणाऱ्या जैव इंधनच्या (बायो सी.एन जी) गॅस, घरगुती गॅस, सेंद्रिय खत च्या वापरामुळे वातावरण प्रदूषण मुक्त होईल, पेट्रोल, डिझेल च्या वापरावर नियंत्रण येईल, त्यामुळे सरकारचे इंधन आयाती साठी जाणारा पैसा वाचेल तसेच विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी गावा गावातील शेतकऱ्यांना प्रो्साहन दिला जाईल व त्यांचे उत्पादन गावातच खरेदी केल्या जाईल त्यामुळे शेतकऱ्या मोबदला चांगला मिळेल व नागरिकांना शुद्ध अन्न,शेतीपूरक उद्योगांमध्ये सुद्धा कंपनी आग्रेसर राहील व यातून सुद्धा मोठा रोजगार महिला बचत गटांना जिल्हात उपलब्ध होईल या कार्यक्रमामध्ये जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्त साधून यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुके असे संपूर्ण भारतातून दोनशे तालुक्यातील उद्योजकांना सोबत सामज्जस करार करण्यात येणार असून लवकरच त्यांच्या प्रकल्प उभारणी करिता सुरवात केल्या जाणार आहे. व या वर्ष अखेरीस दोनशे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट MCL कंपनीचे आहे.


