Homeकोंकण - ठाणेमुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश भोगटे यांना अटक

मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश भोगटे यांना अटक

मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश भोगटे यांना अटक
कुडाळ. प्रतिनिधी.

कुडाळात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे व नगरसेवक गणेश भोगटे यांच्या मध्ये दुपारी 12 च्या दरम्यान प्लॉटिंग वरून झाली होती धक्काबुक्की

तर नगरसेवक गणेश भोगटेंना अटक होण्यासाठी कुडाळ पोलिस ठाण्यात
मुख्याधिकारी श्री.गाढवे यांच्या बाजूने जिल्ह्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी एकवटले होते.

कुडाळ शहरातील एका प्रकल्पाच्या प्लॉटिंग वरून कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश भोगटे आणि कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्यात जोरदार वाद झाला.तर आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप गाढवे यांनी करत कुडाळ पोलिस ठाण्यात नगरसेवक श्री. भोगटे यांच्या विरोधात तक्रार दिल्याने,अखेर गणेश भोगटे यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.

कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी नगरसेवक गणेश भोगटे यांच्या विरोधात कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन,या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, गणेश भोगटे यांनी आपल्या अंगावर खुर्ची भिरकावली व शिव्या दिल्या.तर अंगावर धावून आले.अशी तक्रार दिल्याने अखेर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी नगरसेवक गणेश भोगटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून,कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच मुख्याधिकारी यांच्या बाजूने जिल्ह्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी कुडाळात आले होते.यामध्ये जिल्हा प्रशासक अधिकारी वैभव साबळे,सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.जयंत जावडेकर,वेंगुर्ले नगरपालिकेचे डाॅ.अमित सोंडगे,दोडामार्ग नगरपंचायतीचे शिवराज कामले, देवगड नगरपंचायतीचे कौस्तुभ दिवेगावकर, कणकवली नगरपालिकेच्या अवधुत तावडे, मालवण नगरपालिकेचे संतोष झिरगे,आदी मुख्याधिकारी एकवटले होते.

तर गणेश भोगटे यांना अटक होऊ नये,हे प्रकरण मिटले पाहिजे यासाठी कुडाळ पोलिस ठाण्यात आज दुपारी नगराध्यक्ष ओंकार तेली,नगरसेवक सुनील बांदेकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,नितीन सावंत,आनंद शिरवलकर,राजू गवंडे,नगरसेवक सचिन काळप,नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर,रूपेश पावसकर,दर्शन पाटकर,केळबाईवाडी ग्रामस्थ आले होते. मात्र जिल्ह्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी एकवटल्या अखेर भोगटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.