Homeकोंकण - ठाणेगेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण. घरीच राहा...

गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण. घरीच राहा सुरक्षित.

गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण.
घरीच राहा सुरक्षित.

मुंबई प्रतिनिधी.

राज्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. हा लॉकडाऊन १ मेच्या सकाळी ७ पर्यंत असणार आहे. आता या लॉकडाऊनचा परिणाम कितपत होईल हे येत्या काळात समजले. दरम्यान गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०१ मृत्यू, यवतमाळ- २२, रायगड- १६, नागपूर- १३, नांदेड- ९, नाशिक- ८, औरंगाबाद- ७, परभणी- ५, सोलापूर- ४, ठाणे- ४, वर्धा- ४, अहमदनगर- ३, कोल्हापूर- २, जळगाव- १, नंदूरबार- १, पुणे- १ आणि सातारा- १ असे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.