श्रवण राठोड यांचं पार्थिव देण्यास नकार. १० लाखांचं बिल थकीत. संगीतकार श्रवण राठोड यांचं करोनामुळे झालं निधन
श्रवण राठोड यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडला बसला आहे धक्का
श्रवण राठोड याचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यास रुग्णालयानं दिला नकार
मुंबई:-प्रतिनिधी.
कोरोना व्हायरसनं सध्या देशात थैमान घातलं आहे. ज्याचा फटका बॉलिवूडलासुद्धा बसला आहे. नुकतंच संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोना व्हायरसमुळे निधन झालं आहे. पण त्यांचा मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलेला नाही. श्रवण राठोड यांचं 10 लाख रुपयांचे बिल थकल्याने त्यांचे पार्थिव मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर श्रवण राठोड यांना दोन दिवसांपूर्वी त्यांना एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रवण यांना कोरोनाबरोबरच इतर अनेक आजार असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. श्रवण यांच्यावर डॉ. किर्ती भूषण हे उपचार करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हे व्हेंटिलेटवर होते.
श्रवण राठोड यांच्या मृत्यूचे कारण ऑर्गन फेल्युअर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ते उपचार घेत असलेल्या माहिममधील एस. एल. रहेजा रुग्णालयाचे सात दिवसांचे जवळपास १० लाख रुपयांचे बिल थकित आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार याची माहिती श्रवण यांचा मुलगा संजीवनं दिली आहे. त्यामुळे श्रवण यांचा मृतदेह मिळण्यास विलंब होत आहे. श्रवण राठोड यांचं १० लाख रुपयांचं इन्शुरन्स आहे. मात्र त्यांचे कुटुंबीयही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने एस. एल. रहेजा हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि संबंधित विमा कंपनीसोबत बिलाच्या सेटलमेंटबाबत चर्चा सुरु आहे.
१९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये नदीम- श्रवण या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.