आम्ही १० दिवसांसाठी सुनावणी काय टाळली.- तुम्ही सरकार स्थापन केले. – सरन्यायाधीशांनी सुनावले शिंदे गटाला खडे बोल
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षकारांकडून जोरदार युक्तिवाद झाला.परंतु या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला खडे बोल सुनावले आणि काही प्रश्न विचारले. आज न्यायालयाने कुठलाही निर्णय दिला नाही. उद्या यावरून सुनावणी होणार आहे. यावेळी आम्ही १० दिवसांसाठी सुनावणी काय टाळली तुम्ही सरकार स्थापन केले असे खडे बोल सुनावले.
असा झाला युक्तिवाद
उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की २/३ आमदारांना पक्षातून वेगळे व्हायचे असेल तर त्यांनी कुठल्यातरी पक्षात विलीन होणे गरजेचे आहे किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करायला हवा. हे लोक आम्हीच मूळ पक्ष आहोत असे नाही म्हणू शकत असे सिब्बल म्हणाले. यावर सरन्यायाधीश म्हणाले की म्हणजे शिंदे गटाने भाजपने सामील व्हायला हवे होते किंवा नवीन पक्ष स्थापन स्थापन करायला हवा होता का? त्यावर सिब्बल म्हणाले की कायदा तसाच आहे. सरन्यायाधीशांनी विचारले की या केस संबंधित सर्व कायदेशीर प्रश्न जमा केले आहेत का? तेव्हा सॉलिसिटर तुषार मेहता यांनी हे प्रश्न आपण जमा करत असल्याचे सांगितले.
पक्ष म्हणजे फक्त आमदारांचा गट नव्हे – सिब्बल
आमदारांचा गट म्हणजे पक्ष नव्हे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तसेच बंडखोर आमदारांना पक्षाच्या बैठकीत बोलावण्यात आले होते तेव्हा हे बंडखोर बैठकीला अनुपस्थित होते. त्यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र लिहिले तसेच विधानसभेत आपला प्रतोदही नेमला असे सिब्बल म्हणाले. या बंडखोरांनी पक्ष सोडला आहे, आपणच शिवसेना आहोत असा दावा बंडखोर करू शकत नाहीत, आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. संविधानात कलम १० मध्ये पक्षांतर बंदी कायदा विचार करून टाकण्यात आल आअहे. जर अशा प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करून काही आमदार बहुमताचे सरकार पाडतील आणि पक्षावरही आपला हक्क सांगतील. पक्ष सोडणारे बंडखोर आमदार अपात्र आहेत हे लोक निवडणूक आयोगाकडे आपणच मूळ पक्ष आहोत असा दावा कसा काय करू शकतात? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.
न्यायालयाचे खडे बोल.

सरन्यायाधीश म्हणाले की आम्ही १० दिवसांसाठी सुनावणी पुढे काय ढकलली तुम्ही तर सरकार स्थापन केले, विधानसभा अध्यक्ष बदलले आता तुम्ही म्हणत आहात की हे सारे निरर्थक आहे. अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावले. आम्ही असे काहीच म्हणालो नाही या मुद्द्यांवर आम्ही विचार करत आहोत असे उत्तर शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी दिले आहे. या प्रकरणी आपण सगळे मुद्दे ऐकू असे सरन्यायाधीश म्हणाले.