Homeकोंकण - ठाणेराज्यातील सत्ता संघर्षावर मोठा निर्णय !.- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्या महत्वाच्या...

राज्यातील सत्ता संघर्षावर मोठा निर्णय !.- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्या महत्वाच्या सूचना

राज्यातील सत्ता संघर्षावर मोठा निर्णय !.- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्या महत्वाच्या सूचना

नवीदिल्ली – वृत्तसंस्था.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर तयार झालेल्या राजकीय पेच थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचला आहे. काल देखील सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी घेतली होती. आज पुन्हा एकदा न्यायालयाने दोन्हीही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि काही महत्वाचे निर्देश दिले.
शिवसेना नेमकी कोणाची ? आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का ? याकडे देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे.तसेच याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी पार पडेल असे देखील यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्या संघर्षाबाबत आजही न्यायालयाने कोणताही निवाडा केला नाही. न्यायालयात आजही दोन्हीही वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आता ८ ऑगस्टच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.