Homeकोंकण - ठाणेआजरा महाविद्यालयात ११ वी कला. - नवागतांचा स्वागत समारंभ संपन्न.- प्रा. रमेश...

आजरा महाविद्यालयात ११ वी कला. – नवागतांचा स्वागत समारंभ संपन्न.- प्रा. रमेश चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन.

आजरा महाविद्यालयात ११ वी कला. – नवागतांचा स्वागत समारंभ संपन्न.- प्रा. रमेश चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा महाविद्यालय आजरा येथे नवागतांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवागतांचा शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले यावेळी १२ वी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये निकिता कांबळे, वैभव कांबळे, सुजल बटकली, सुमन येडगे, श्वेता पोतनीस, पवन कांबळे, कसरझेबा चाॅद यांनी मनोगते व्यक्त केली. प्रमुख मार्गदर्शक प्रा. रमेश चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कलाही मानव्यशास्त्राची शाखा असून माणूस घडवण्याची कार्य कला शाखेकडून अविश्तपणे होत असते. कला शाखेतूनच शासकीय सेवेत करिअर घडविता येते कला शाखा ही यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची असून स्वतःची ओळख करून घेण्याचा बहुमोल असा मार्ग आहे. असे श्री चव्हाण सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना कला हा सर्व शाखेंचा पाया असून कलेमधून माणुसकीचे दर्शन घडते इतकी माफक अपेक्षा आहे. असे मत उपप्राचार्य श्री संकपाळ यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. विठ्ठल हाक्के यांनी केले. तर स्वागत श्रीमती शोभा केंद्रे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन श्रीमंती सुवर्णा धामणेकर यांनी केले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्राध्यापक विनायक चव्हाण, रत्नदीप पोवार, संदीप देसाई, अल्बर्ट फर्नांडिस तसेच सौ. कांबळे सह कार्यालयीन स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. आभार प्रा. अनिल निर्मळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.