Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रडॉ. अनिल देशपांडे यांच्या एकसष्टवीला शुभेच्छांचा वर्षाव. - आज पासून आजी-माजी सैनिकांना...

डॉ. अनिल देशपांडे यांच्या एकसष्टवीला शुभेच्छांचा वर्षाव. – आज पासून आजी-माजी सैनिकांना मोफत उपचार देणार. – डॉ. अनिल देशपांडे.

डॉ. अनिल देशपांडे यांच्या एकसष्टवीला शुभेच्छांचा वर्षाव. – आज पासून आजी-माजी सैनिकांना मोफत उपचार देणार. – डॉ. अनिल देशपांडे.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहातील आजरा अर्बन बँकेचे चेअरमन आजरा सूतगिरणीचे व्हा. चेअरमन, जनता एज्युकेशन सोसायटी आजराचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा आजराचे सचिव, आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे संचालक डॉ. अनिल देशपांडे यांचा ६१ वा वाढदिवस या सर्व संस्थेच्या वतीने येथील अण्णाभाऊ सभागृहात दि. २ रोजी मोठ्या संपन्न झाला. या एकसष्टी समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील यांनी केले. ज्यावेळी बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले संस्थेमध्ये कामकाज करत असताना आम्ही दोघेही सर्वांना सोबत घेऊन काम करतो अण्णा व भाऊंनी सर्वांना सोबत घेऊन चालवत आणलेला हा सर्व संस्थेचा कारभार आम्ही दोघे तसेच सर्व संचालक मंडळ मार्गदर्शकांना घेऊन चालवत आहोत डॉक्टर अनिल देशपांडे यांचा शांत व संयमी स्वभाव हा भाऊंच्या सारखा हिताचा आहे जसे भाऊ अण्णांना समजून घेत तसे डॉ. देशपांडे मलाही समजून घेतात त्यांच्या एकसष्टी वी निमित्ताने अण्णाभाऊ संस्था समूहाच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो असे बोलताना श्री.चराटी म्हणाले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील म्हणाले भाऊंच्या पासून या कुटुंबाशी माझी जवळीक आहे प्रत्येकाचा मार्ग जरी वेगळा असला तरी संस्थेच्या माध्यमातून संस्था व्यवस्थित चालावा हेच ध्येय असतं राजकारण व समाजकारण करत असताना विचार वेगवेगळ्या असतात परंतु अण्णाभाऊ यांनी निर्माण केलेल्या या सर्व संस्था या सर्व जनतेच्या हिताच्या ठरल्या आहेत जसं अण्णा भाऊ यांनी संस्थेच्या हिताचे काम केलं तसंच काम डॉ. श्री देशपांडे व अशोक चराटी यांनी करावे. असे श्री पाटील म्हणाले.
यावेळी जी. व्ही. बांदेकर, प्रकाश दादा वाटवे, के. व्ही. येसणे, डॉ.संदीप देशपांडे, जि. प. माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची डॉक्टर अनिल देशपांडे यांना शुभेच्छा देत भाषणे झाली.
शुभेच्छाचे आभार मानताना डॉ. अनिल देशपांडे म्हणाले अण्णाभाऊं अण्णाभाऊ यांच्यासोबत चे सर्व संस्था चालक यांनी या संस्था स्थापन करताना तालुका चा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला म्हणून आज या संस्था सुरळीतपणे चालू आहेत. मागील ६० वर्षाच्या जीवनामध्ये भाऊनी व कुटुंबाने केलेले संस्कार व पाठिंबा तसेच ३२ वर्ष मागे उभे राहिलेली पत्नी डॉ.अंजली देशपांडे बहिणी भाऊ कुटुंबातील सर्व मंडळी ज्यांनी मला खूप मोठा आधार दिला परंतु अचानकपणे अण्णा भाऊंच्या जाण्याने जीवनात पोकळी निर्माण झाली. परंतु अण्णा भाऊंच्या संस्काराने व आशीर्वादाने यापुढेही संस्था सुरळीत राहतील यासाठी आमचा प्रयत्न नेहमी राहील या एकसष्टि निमित्त आजरा तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांना आजपासून मोफत उपचार देणार असल्याचे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जाहीर केले. व उपस्थित यांचे आभार मानले


या एकसष्टी समारंभाला सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, उद्योजक रमेश रेडेकर, कारखाना संचालक दिगंबर देसाई, दशरथ अमृते, विलास नाईक, अनिकेत चराटी, डॉ. अंजली देशपांडे, संजय सावंत, जी. एम. पाटील, मारुती मोरे, आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे, संचालक नारायण मुरुकटे, रामचंद्र मुरुकटे, तसेच जितेंद्र टोपले, आजरा सूतगिरणीचे सचिन सटाले सह सर्व अधिकार वर्ग आजराअर्बन बँकेचे, व जनता एज्युकेशनचे सर्व संचालक, कर्मचारी,इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा आजरा येथील सर्व डॉक्टर, तालुक्यातील विविध संस्थेचे चेअरमन व चेअरमन सरपंच कार्यकर्ते देशपांडे कुटुंबातील सर्व सदस्य हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अशोक बाचुळकर यांनी केले तर आभार भैया टोपले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.