महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा महत्त्वाच्या घडामोडी सह्याद्री न्यूज अपडेट.
मुंबई. – प्रतिनिधी.
लोकसभेतही शिंदे गटाला मान्यता:- राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदाला
लोकसभा अध्यक्षांची मंजुरी; 12 सेना खासदारांची झाली परेड
आषाढी काळात विठ्ठलाच्या चरणी पावणेसहा कोटींचे दान ;- २०१९ च्या वारीच्या तुलनेत दोन कोटींची वाढ, छायाचित्रे विक्रीतून २ लाख २९ हजार रुपये तर नवीन भक्त निवास येथून १४ लाख ५७ हजार रुपये इतके उत्पन्न समितीला मिळाले.
आत्मसमर्पणासाठी नगरच्या पोलीस दलाची मोहीम- पोलीस कर्मचाऱ्यांचे पाल्य आणि आदिवासी समाजासाठी रोजगार मेळावा आयोजित केला होता.
संजय राऊतांबाबत प्रश्न विचारताच उदयनराजेंनी जोडले हात, म्हणाले, “संजय राऊत हे देव आहेत. त्यांचं नाव माझ्यासमोर घेऊन माझं तोंड खराब करू नका.”
मंत्रीपद देण्याच्या नावाखाली १०० कोटींची मागणी ;- गुन्हे शाखेकडून चौघांना अटक आमदारांच्या खासगी सचिवांच्या तक्रारीवरून या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात 12 खासदारही सामील,- खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने प्रकटले
पवारांनीच शिवसेना फोडली:- डोळ्यांत पाणी आणून रामदास कदमांचा घणाघात; 50 आमदार का गेले? उद्धवसाहेब आत्मपरीक्षण करा!
एकनाथांचा शिवसेनेला धक्का :- युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची पदावरून हकालपट्टी; शिंदे गटातील किरण साळींची नियुक्ती
खासदार राहुल शेवाळेंच्या अडचणीत वाढ:- अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, न्याय न दिल्यास आत्महत्येचा इशारा
सुट्टे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी केंद्र सरकारकडून अखेर मागे घेतला; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
नुपूर शर्मा यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती:- 10 ऑगस्टला पुढील सुनावणी, SC सर्व खटले ट्रान्सफर करण्याचा करू शकते विचार
17 ऑगस्टपासून भाजपचे मिशन 400 +: केंद्रीय मंत्री दर महिन्याला विजयी आणि पराभूत जागांवर दर 15 दिवसांनी भेट देतील.
अमृता फडणवीस यांचे इमोशनल साँग रिलीज:- चाहत्यांसाठी अमृता घेऊन आल्या नवे गाणे, मुकेश यांच्या गाण्याला नवीन रुपात केले सादर.
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ लवकरच:- संदीप पाठक शो करणार होस्ट, परीक्षकांच्या खुर्चीत दिसतील सोनाली आणि गश्मीर
२० मिनिटांचे मार्गदर्शन पुरेसे!. – कोहलीच्या फलंदाजीतील समस्या निराकरणासाठी गावस्कर यांचा प्रस्ताव