Homeकोंकण - ठाणेठाकरेंना नडले की पक्षाबाहेर काढले. - आनंदराव अडसूळ, रामदास कदमांची. - हकालपट्टी.

ठाकरेंना नडले की पक्षाबाहेर काढले. – आनंदराव अडसूळ, रामदास कदमांची. – हकालपट्टी.

ठाकरेंना नडले की पक्षाबाहेर काढले. – आनंदराव अडसूळ, रामदास कदमांची. – हकालपट्टी

मुंबई :- प्रतिनिधी.

एकेकाळी ‘मातोश्री’चे निष्ठावंत असलेल्या यांनी मागील आठवड्यात पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला तर आज आजन्म पक्षाशी गद्दारी करणार नाही म्हणणाऱ्या यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर जाहीर टीका करुन शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांनी ठाकरेंशी घेतलेल्या पंग्यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेऊन उद्धव ठाकरे यांनी दोघांचीही शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. नवा दिवस नवी हकालपट्टी हे समीकरण शिवसेनेत रुढ झालं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शिवसेना पदाधिकारी, आमदार-खासदार एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत. त्यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून सामनातून दररोज कुणाच्या ना कुणाच्या हकालपट्टीचं वृत्त प्रसिद्ध होत असतं. आजही रामदास कदम यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच त्यांच्या हकालपट्टीचं वृत्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालतर्फे प्रकाशित केलं गेलं. यावेळी आनंदराव अडसूळ यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रामदास कदम यांचा पक्षनेतेपदाचा राजीनामा बाळासाहेबांचे विश्वासू, मातोश्रीचे निष्ठावंत, शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते, ज्यांनी आपलं संपूर्ण आयु्ष्य भगव्यासाठी वेचलं, त्या रामदास भाई कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अत्यंत खरमरीत पत्र लिहीत आपल्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. जसं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालंय, तसं मी तोंड दाबून लाथा-बुक्क्यांचा मार सहन करतोय. बाळासाहेबांनी माझी नेतेपदी निवड केली पण तुम्ही मात्र माझा आणि माझ्या मुलाचा कित्येकदा अपमान केला. शिवसेनेचा वाईट काळ असताना माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. पण तुम्ही मात्र गेल्या ३ वर्षापासून मीडियासमोर बोलायचे नाही, असे आदेश दिले. हे सगळं का आणि कशासाठी? असे एक ना अनेक सवाल करत रामदास भाईंनी उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.
विनायक राऊतांच्या सहीने अडसूळांची हकालपट्टी आनंदराव अडसूळ यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.