भविष्यातील आवाहानांचे रुपांतर संधीत करण्यासाठी विद्यार्थीनी सक्षम बनावे.- ॲड. भगवानराव साळुंखे.
पुणे. – प्रतिनिधी.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू ॲकॅडमी व ग्लोबल टॅलेंट ट्रॅक यांचे संयुक्त विद्यमाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे उद्घाटन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड व श्री प्रभाकर देशमुख, माजी सनदी अधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना संयुक्त चिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे यांनी कोरोनाच्या काळात तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून महाविद्यालयाने हि मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असतानाच तरुणांनी स्वतः व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षे करीता जोमाने तयारी करावी. अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय व राजर्षी शाहू ॲकॅडमी सदैव राज्यातील मुलामुलींच्या दर्जेदार शिक्षणासाठी व उद्योग विश्वाकरिता आवश्यक ते सर्व कौशल्य शिकविण्या बरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता सदैव कार्यरत राहतील. संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.शरद पवार साहेबांना अपेक्षीत असलेले विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून तयार व्हावेत अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली. महाविद्यालयात डॉ.एन.बी.पासलकर यांचे मार्गदर्शनात सुरु असलेल्या इनोव्हेशन क्लब सदस्यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. देशातील बेरोजगारीच्या भीषण वास्तवाची जाणीव तरुणाईला करून देताना अग्निपथ या योजनेमध्ये ३५०० जागांसाठी सात लाख अर्ज आल्याचे उदाहरण देऊन भविष्यातील आवाहानांचे संधीत रुपांतर करण्यासाठी विद्यार्थ्याने सक्षम होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड यांनी कष्ट करण्याची तयारी ठेऊन बदलत्या काळानुसार नवीन स्कील आत्मसात करावेत. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा म्हणजे काम करताना आनंद मिळेल असा सल्ला देऊन नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग सुरु करून नोकरी देणारे बना असा कानमंत्र दिला. प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे महत्व व व्याप्ती सांगितली. ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट अधिकारी प्रा. दिगंबर पवार यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हसाठी आलेल्या विविध कंपन्याची ओळख करून दिली. या रोजगार मेळाव्यासाठी इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक, आयटीआय, बीएस्सी, बीकॉम, बीए, फार्मसी, बारावी, दहावी शैक्षणिक पात्रता असलेल्या सबंध महाराष्ट्रातील १०००विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.
सदर मेळाव्यासाठी सौ.प्रमिलाताई गायकवाड प्रभाकर देशमुख ॲड. भगवानराव साळुंखे, श्री विजयसिंह जेधे,धैर्यशील वंडेकर, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक चे सोनी डिसुझा, प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, समन्वयक प्रा.दिगंबर पवार विविध कंपन्याचे एच.आर, सर्व विभागप्रमुख व विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते. या मेळाव्याचे सूत्र संचालन प्रा.स्नेहा साळवेकर व प्रा.धनश्री वारे यांनी केले.