Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा अर्बन बँकेचा शाखा कडगाव येथे ग्राहक मेळावा संपन्न.

आजरा अर्बन बँकेचा शाखा कडगाव येथे ग्राहक मेळावा संपन्न.

आजरा अर्बन बँकेचा शाखा कडगाव येथे ग्राहक मेळावा संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील दि. आजरा – अर्बन को-ऑपरेटिक बँक ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत असून बँकेचा एकूण व्यवसाय रुपये १२ शे कोटीचा आहे. बँकेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाला असून नेट एनपीए ०℅ आहे. शाखेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावा आयोजित केला होता. सदर मेळाव्याला ग्रामीण भागातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याला प्रतिसाद दिला आपली बँक शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असून ग्रामीण भागातील ग्राहक केंद्रबिंदू मानून वाटचाल चालू आहे. तसेच नॅशनल बँका ज्या सेवा सुविधा देत आहेत त्या सर्व आपल्या बँकेकडे उपलब्ध असून त्यांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले ते कडगाव ता. भुदरगड येथील बँकेच्या शाखा वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळावा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कडगावचे सरपंच संजय चव्हाण होते. चेअरमन श्री देशपांडे बोलताना पुढे म्हणाले बँकेच्या कार्याचा आढावा ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरांमध्ये शाखाचा विस्तार असणारी मल्टीस्टेट दर्जाचा दर्जाची आजरा अर्बन बँक ही अग्रगण्य बँक म्हणून राज्यासह देशभरात नावलौकिक पात्र झाली आहे. आज अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या मार्गदर्शनाखाली समूहातील सर्व संस्था प्रगतीपथावरती असल्याने त्यांनी सांगितले यावेळी आपल्या प्रास्ताविकात कडगाव शाखेचे स्थानिक संचालक श्री शैलेश उगळीगड्डी यांनी कडगाव शाखेचा प्रगतीचा आढावा घेतला व शाखा स्थापनेपासून १००% कर्ज वसुली व मुख्य कार्यालयाकडून आलेले सर्व टार्गेट पूर्ण करण्यासाठी परिसरून घेतलेले कर्मचारी व सभासदांचे आभार मानले. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव देसाई, सदस्य अजित मांगले, संचालिका श्रीमती शैला टोपले, सौ. प्रणिता केसरकर, सौ अस्मिता सबनीस, कर्ज विभाग प्रमुख बंडू प्रभूसो डॉ. काजी ए.जी.कासार सचिन जाधव, श्रीकांत हावळ, अमृत शिंदे, शिवसेनेचे माजी ता.प्रमुख बचाराम गुरव, हर्षल उळेगड्डी, रामचंद्र मांगले, सुभाष गुजर, भानुदास हावळ पांडुरंग गोजरे, समित देसाई, आदी उपस्थित होते. स्वागत शाखाधिकारी जोतिबा निकम यांनी केले तर आभार अभिजीत केसरकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.