Homeकोंकण - ठाणेओळख निसर्गाची उपक्रमांतर्गत. - अनंतराव पवार अभियांत्रिकीची तळजाई टेकडीवर भ्रमंती उपक्रम संपन्न.

ओळख निसर्गाची उपक्रमांतर्गत. – अनंतराव पवार अभियांत्रिकीची तळजाई टेकडीवर भ्रमंती उपक्रम संपन्न.

ओळख निसर्गाची उपक्रमांतर्गत. – अनंतराव पवार अभियांत्रिकीची तळजाई टेकडीवर भ्रमंती उपक्रम संपन्न.

पुणे. – प्रतिनिधी.

पुणे येथील आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे वतीने अनोखा उपक्रम संपन्न झाला.
एखादी गोष्ट चार भिंतींमध्ये शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर नेऊन शिकवली तर ती विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहते या उद्देशाने येथील महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जैवविविधतेने परिपूर्ण अशा तळजाई टेकडीवर भ्रमंती केली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमा दरम्यान प्राकृतिक घटकातील डोंगर, विविध भूरूपे, मृदा, आल्हाददायक हवामान, खडक, जलप्रणाली, औषधी वनस्पती, नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणातील विविध घटकांचे प्रत्यक्ष अवलोकन अशा जैवविविधतेच्या विविध घटकांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. तलाव, समतल पातळीचे चर व त्यामुळे वाढणारा भूजल साठा, विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे वेगवेगळे आवाज, पक्षांच्या हालचालींचे निरीक्षण, सरपटणारे प्राणी व त्यांच्या हालचाली, दुर्मिळ प्रजातीची फुलपाखरे,फुलझाडे, रिमझिम पडणारा पाउस, धुके या गोष्टी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या. मेट्रो प्रकल्पांतर्गत निसर्गाला अभियांत्रिकीची जोड देऊन वृक्ष पुनर्रोपण प्रकल्पाचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महाविद्यालयाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ. बालाजी सेलूकर यांनी प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली केले. ओळख निसर्गाची या उपक्रमामध्ये डॉ.गायत्री कांबळे,प्रा.सचिन यादव, प्रा. रणजीत गायकवाड, प्रा.अक्षदा गोगावले, प्रा.राजेश खरात, प्रा.योगिता कांबळे, प्रा.हर्षा अभिचंदानी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाने अशाप्रकारे ओळख निसर्गाची या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.