Homeकोंकण - ठाणेसंकेश्वर - बांदा रस्ता रुंदीकरणात वृक्षलागवडीचा करारच गायब?( वृक्षसंवर्धनाबाबत कंपनीची चालढकल.- वृक्षप्रेमी...

संकेश्वर – बांदा रस्ता रुंदीकरणात वृक्षलागवडीचा करारच गायब?( वृक्षसंवर्धनाबाबत कंपनीची चालढकल.- वृक्षप्रेमी समूह न्यायालयात जाणार.)

संकेश्वर – बांदा रस्ता रुंदीकरणात वृक्षलागवडीचा करारच गायब?
( वृक्षसंवर्धनाबाबत कंपनीची चालढकल.- वृक्षप्रेमी समूह न्यायालयात जाणार.)

आजरा : प्रतिनिधी.

संकेश्वर-बांदा रस्ता तसेच चंदगड-वाटंगी फाटा ते जिल्हा हद्द या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणादरम्यान होणारी वृक्षतोड आणि त्याच्या बदल्यात करण्यात येणारी वृक्षलागवड व संवर्धन याबाबत वृक्षप्रेमी समूह आजरा गेल्या वर्षभरापासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, संकेश्वर-बांदा रस्ता रुंदीकरण प्रकरणात वृक्षतोड व भरपाई म्हणून करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीसंदर्भातील करारपत्राची प्रतच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे

गेल्या सहा महिन्यांपासून वृक्षप्रेमी समूहाने वनविभाग व रस्ता कंपनी यांच्यातील करारपत्राची माहिती अधिकारातून मागणी केली होती. मात्र, लेखी व तोंडी विचारणा करूनही करारपत्र मिळाले नाही. वनविभाग कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून इतर कागदपत्रे मिळाली; परंतु करारपत्राबाबत विचारणा केली असता, परिक्षेत्र वन अधिकारी, आजरा यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी उत्तर देताना संबंधित कामाच्या करारपत्राची प्रत कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.
करारपत्राची प्रतच उपलब्ध नसल्याने संबंधित कंपनी किती वर्षे आणि कोणत्या अटींवर वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन करण्यास बांधील आहे, हे स्पष्ट होत नाही. या गंभीर प्रकाराबाबत वृक्षप्रेमी समूहाने वरिष्ठ अधिकारी तसेच न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, चंदगड-वाटंगी फाटा ते महागाव या जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरण प्रकरणातही संबंधित कंपनीकडून वृक्षलागवडीबाबत चालढकल सुरू असल्याचा आरोप वृक्षप्रेमी समूहाने केला आहे. करार करतानाच वृक्षलागवडीची जागा निश्चित होणे आवश्यक असताना कंपनीच्या प्रतिनिधींकडून अद्याप जागा निश्चित झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वी तहसीलदारांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत कंपनीने पंधरा दिवसांत अंतिम आराखडा सादर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही ठोस उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धनाच्या प्रश्नावर वृक्षप्रेमी समूहाने आता न्यायालयीन लढ्याचा पवित्रा घेतला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.