Home कोंकण - ठाणे आजरा तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना; अपघातात महिलेचा मृत्यू, दुकानफोडीत १.५५ लाखांचा मुद्देमाल...

आजरा तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना; अपघातात महिलेचा मृत्यू, दुकानफोडीत १.५५ लाखांचा मुद्देमाल चोरी, तर बांबूच्या टोळक्याने मारहाण

Oplus_131072

आजरा तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना; अपघातात महिलेचा मृत्यू, दुकानफोडीत १.५५ लाखांचा मुद्देमाल चोरी, तर बांबूच्या टोळक्याने मारहाण.

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना; अपघातात महिलेचा मृत्यू, दुकानफोडीत १.५५ लाखांचा मुद्देमाल चोरी, तर बांबूच्या टोळक्याने मारहाण. आजरा तालुक्यात २१ व २२ नोव्हेंबरदरम्यान अपघात, दुकानफोडी आणि मारहाणीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आजरा-रोडवरील पेंढारवाडी परिसरात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत रेणुका अनिल चव्हाण (वय ४२, रा. पेंढारवाडी) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकलस्वाराने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह

दुसऱ्या घटनेत आजरा आंबोली रोडवरील गारवा हॉटेलजवळ असलेल्या ए-१ तांदूळ विक्री केंद्राच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तांदूळ व ड्रायफ्रूटची चोरी केली. यामध्ये १२० किलो ड्रायफ्रूट काजू, ४५० किलो निरकोलम तांदूळ आणि ३३० किलो स्वच्छ भारत तांदूळ असा एकूण १ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी अनिस रमजान नेसरीकर यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत चांदवडी येथे किरकोळ वादातून बांबूच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली. भात कापून नेल्याच्या संशयावरून फोनवरून विचारणा केल्यानंतर झालेल्या वादातून हा प्रकार घडला. यामध्ये प्रकाश भिकाजी हसब (वय ५२) यांना बांबूच्या टोळक्याने मारहाण केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही घटनांचा पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत. तालुक्यात एकाच कालावधीत घडलेल्या या घटनांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.