Homeकोंकण - ठाणेशिवसेनेच्या वर्धापन दिनी बोरिवलीत विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी बोरिवलीत विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी बोरिवलीत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर )

       राज्यातील मुख्यमंत्री  पदावर आरुढ असलेल्या शिवसेना या पक्षाच्या ५६ व्या वर्धापन दिना निमित्त बोरिवली पश्चिम येथील साई गणेश मंदिर, गोशाळा, सेक्टर -६ येथे विद्यार्थ्यांना शिवसेना उपविभाग प्रमुख दामोदर म्हात्रे,शाखा प्रमुख श्री.सुनिल पाटील,शाखा प्रमुख श्री.सचिन म्हात्रे, उपशाखा प्रमुख संजय पवार यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.माणसाच्या आयुष्याची जडण घडणीत वह्या पुस्तकांच्या शिड्यांची भूमिका महत्वाची असते, वह्या पुस्तकांमुळेच मानवाची खऱ्या अर्थाने प्रगती होत असते असे प्रतिपादन शाखा प्रमुख सुनील पाटील  यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.आमदार, शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस,  उपविभाग प्रमुख दामोदर म्हात्रे,शाखा प्रमुख श्री.सुनिल पाटील,शाखा प्रमुख श्री. सचिन म्हात्रे, उप शाखा प्रमुख संजय पवार यांच्यासह  शिवसेना शाखा-१२ व  १८ तसेच शाखा १५ आणि १७ आणि  शिवसेना विभाग क्र.१ च्या महिला -पुरुष,युवा  पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांनी हा वह्या वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विशेष परिश्रम घेतले.विभागात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.