Homeकोंकण - ठाणेपंजाब - हरियाणात कोटींचा दरोडा घातलेल्या चौघे आरोपी. - आजरा पोलीसांच्या जाळ्यात....

पंजाब – हरियाणात कोटींचा दरोडा घातलेल्या चौघे आरोपी. – आजरा पोलीसांच्या जाळ्यात. ( सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांची नियोजनबंद नाकाबंदी. )

पंजाब – हरियाणात कोटींचा दरोडा घातलेल्या चौघे आरोपी. – आजरा पोलीसांच्या जाळ्यात. ( सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी नियोजनबंद नाकाबंदी. )

आजरा. – प्रतिनिधी.

पंजाब – हरियाणा येथे १ कोटींचा दरोडा घालून व त्यात एकाला जखमी करुन फरार झालेल्या ४ दरोडेखोरांना आजरा पोलीसांनी मोठ्या धाडसाने अटक केली.जिल्हा प्रमुखांनी १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. हरियाणा येथे १ कोटींचा दरोडा घातलेले ४ दरोडेखोर आजरा मार्गे गोव्याला जाणार असल्याची माहिती काल हरियाणा पोलीस,कोल्हापूर आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कडून आजरा पोलीसांना मिळाली.


आज आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी नाकाबंदी लावत स्वतः कोगनोळी टोल नाक्यापासून खासगी गाडीने पाठलाग सुरु ठेवला. या दरोडेखोरांच्या बाबत उत्तूर औटपोष्टचे सहा. फौजदार विराप्पा कोचरगी यांना याची कल्पना दिली.त्यांच्याजवळ शस्त्रे असून गोळीबार करण्याची शक्यता असल्याचेही सांगितले.


कोचरगी व पोलीस कर्मचारी राजेश आंबूलकर, निरंजन जाधव, अमोल पाटील यांनी मधेच मुमेवाडी जवळ या दरोडेखोरांच्या गाडीला मोठ्या धाडसाने अडवत चौघांना ताब्यात घेतले व तसा फोन सपोनि हारुगडे यांना केला.शस्त्रे नसताना कोचरगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केल्याच्या बातमीवर प्रथम विश्वास बसला नाही. घटनास्थळी दाखल होवून पाहिल्यावर वस्तूस्थिती खरी होती. अभय प्रदिप सिंग (वय २० रा.बांध ता. इश्राना जिल्हा पानिपत हरियाणा, आर्य नरेश जगलान (वय २० रा. इश्राना जिल्हा पानिपत हरियाणा,महिपाल बलजित झगलान (वय ३९ रा. इत्राना जिल्हा पानिपत हरियाणा व सनिकृष्ण झगलान (वय १९ रा. इश्राना जिल्हा पानिपत) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना कोल्हापूर मुख्यालय येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या ताब्यात दिले.सपोनि हारुगडे व पोलीस कर्मचा-यांच्या ह्या धाडसा बद्दल पोलीस अधीक्षक यांनी कौतुक करत १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अशा अट्टल गुन्हेगारांना आजरा पोलिसांनी पाटलाग करून ताब्यात घेतल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.