हंगामाचा पहिला पंधरवडा कोरडाच. – शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात. ( शेतकरी वर्गाला दुबार पेरणीकडे गार्भीयाने पहावे लागणार?. )
आजरा. प्रतिनिधी
पेरणीच्या हंगामाचा पहिला पंधरवडा पाऊस नसल्यामुळे कोरडाच राहिला व शेतकरी वर्गाने केलेली हंगामी पेरणी आता संकटात सापडली आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर आले आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. यासाठी गरज आहे. शेतकऱ्यांना मदतीची दरम्यान महाराष्ट्र शासन तसेच मंत्री दादा भुसे यांनी हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांना पेरणीची गडबड करू नये असे सांगितले होते. परंतु नेहमी बदलणारा हवामान अंदाज चार दिवसात पावसाच्या सरी बसणार या चार दिवसाला पंधरा दिवस झाले तरीही अद्याप पेरणी योग्य असा पाऊस झाला नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार हे निश्चित. कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात भात पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी भुईमूगाची देखील पेरणी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पेरणीला योग्य पाऊस नसल्यामुळे पेरलेले कडधान्य खराब होऊन काही ठिकाणी मुंग्या व पक्ष्यांनी देखील फस्त केले आहे.
महागडी बी-बियाणे वापरून शेतकऱ्यांनी केलेले पेरणी ही संकटात सापडली आहे. यासाठी आता गरज आहे. दुबार पेरणीच्या मदतीची ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून वेळ पडल्यास दुबार पेरणी साठी तालुकास्तरावर मागणी करणे गरजेचे आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात नोंद घातल्यास प्रशासनाला काम करणे सोपे जाईल यासाठी शेतकऱ्यांनी देखील संबंधित विभागाला आपल्या शेतपिकाची माहिती द्यावी लागेल. पण अद्याप कोणताही शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाकडे गार्भीयाने पाहताना दिसत नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली पाहिजेत.