गोकुळ रणधुमाळी दोन्ही आघाडीच्या पॅनलचे उमेदवार जाहीर.. पहा संधी मिळाली कोणाला.
कोल्हापूर प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळ म्हणजे जिल्ह्यातील मिनी विधानसभा मानली जाते या निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलची घोषणा नेतेमंडळीकडून करण्यात आली आहे. दोन्ही पॅनेलमधून अपेक्षित चेहर्यांनाच संधी मिळाली आहे. पॅनेलची घोषणा झाल्यानंतर निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार :
सर्वसाधारण गट – रविंद्र आपटे, रणजित पाटील (मुरगुडकर), दिपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासो खाडे, उदय पाटील, अमरिष घाटगे, सत्यजीत पाटील, सदानंद हत्तरकी, चेतन नरके, धनाजी देसाई, प्रकाश चव्हाण, प्रतापसिंह पाटील, राजाराम भाटले, रविश पाटील कौलवकर, रणजीत बाजीराव पाटील
इतर मागास प्रवर्ग – पी. डी. धुंदरे
अनुसुचित जाती जमाती – विलास कांबळे
भटक्या विमुक्त – विश्वास जाधव
महिला प्रतिनिधी – शौमिका महाडिक, अनुराधा पाटील
विरोधी आघाडीचे उमेदवार :
सर्वसाधारण गट – विश्वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश रामचंद्र पाटील, रणजित के. पी. पाटील, विद्याधर गुरबे, एस.आर.उर्फ संभाजी रंगराव पाटील, महाबळेश्वर शंकर चौगले, किसन बापुसो चौगले.
इतर मागासवर्ग – अमरसिंह यशवंत पाटील.
अनुसुचित जाती जमाती – डॉ.सुजित मिणचेकर,
भटक्या विमुक्त – बयाजी देवू शेळके
महिला प्रतिनिधी – सुश्मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर अशा उमेदवाऱ्या आहेत.