आजरा वडकशिवालेत. – घरफोडी. – फाशीपारधी असल्याचा संशय.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील वडकशिवाले गावात हालेवाडी रोडवर असलेले मनोहर चंद्रु गोईलकर यांच्या घरात दि. ५ रोजी दु. १२ च्या सुमारास घरातील सदस्य शेतावर गेल्याची पारख ठेवून घरफोडी केली असल्याचे समजते. शेतावरून सायंकाळी घरी परतल्यानंतर घराच्या मागच्या बाजूला सिमेंट चा दरवाजा तोडुन चोरट्यांनी कपाटातील सोने व चांदीच्या वस्तू लंपास केल्या असल्याचे निदर्शनास आले. गोईलकर मागील पंधरा दिवसापूर्वी लहान बाळाच्या बारशाला मध्ये आलेली चांदी व अन्य घरातील सोन्याच्या वस्तू लपास केल्या असून. सकाळी शेतावर जात असताना घरासमोरून दोन अनोळखी व्यक्ती फिरत असल्याचे गोविलकर कुटुंबाने सांगितले आहे. तर शेजारच्या लोकांनी दुपारच्या सुमारास दोन लहान मुलं रस्त्यावरून जात येत होती. अशी चर्चा आहे. याबाबत आजारा पोलिसात पोलीस पाटील यांनी माहिती दिल्यानंतर व गावातील ग्रामस्थांना फाशीपारधी असल्याचा संशय आल्यानंतर आजुबाजुच्या शेतामध्ये शोध घेतला असता दोन ठिकाणी फाशी पारधी ठिया मारून जेवण करत असल्याचे दिसले परंतु बॅटरीच्या प्रकाश दिसताच जेवण करत असलेले पाशेपारथी ठिया सोडून भादवण व मडिलगे या दिशेने पलायन केले.
आजरा पोलीस ठाणे यांनी चोरी झालेल्या घरात पंचनामा केला. परंतु रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्यात आलेली नव्हती.
