येणाऱ्या सर्व निवडणुका शिंपी – चराटी गट एकत्र ताकतीने लढवणार. – अशोक चराटी.
( विकास. सेवा संस्थांच्या नवनिर्वाचित संचालकांचा. – व विद्यमान सरपंच, उप. सरपंच सर्व पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न. )
आजरा. – प्रतिनिधी.
येणाऱ्या सर्व निवडणुका शिंपी – चराटी गट एकत्र ताकतीने लढवणार असल्याचे विकास. सेवा संस्थांच्या नवनिर्वाचित संचालकांचा. – व विद्यमान सरपंच, उप. सरपंच पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा प्रसंगी अण्णाभाऊ संस्थां समुहाचे अध्यक्ष अशोक चराटी बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. स्वागत प्रास्ताविक नगरसेवक विलास नाईक यांनी केले. पुढे श्री. चराटी म्हणाले जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे माझा पराभव झाला असला तरी नऊ सेवा संस्था वर विजय मिळविण्यात यश आले आहे. सद्या ५५ संस्था आमच्या गटाकडे आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या मुळे ठराव धारकांना सोडल्यानंतर अचानक निवडणुका लागल्या व आमच्यातील दोघांनी दगाफटका केला यामुळे जिल्हा बँकेत पराभव झाला. भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका शिंपी गट व सराटी गट एकत्र ताकतीने लढवणार आहे. आपसातले मतभेद बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी येणाऱ्या निवडणुकींना सामोरे जायचे आहे. परंतु चराटी गट व शिंपी गट एकत्र आल्यामुळे जिल्ह्याच्या मोठ्या नेत्यांना व तालुक्यातील काही लोकांना त्रास होत आहे. यावेळी चराटी यांनी पेरणोली जिल्हा परिषद मधून जयवंतराव शिंपी यांना मोठ्या फरकाने निवडून आणणार असल्याचे यावेळी सांगितले.
आजरा साखर कारखाना मध्ये चेअरमन असताना झालेल्या घडामोडी वर बोलताना झाले मी वाण्याचा असल्यामुळे मला काही देसाई संचालक गटाने चुकीचे आरोप करून कामगारांना पुढे करून गाडी काढून घेणे अंगावर धावून जाणे असे प्रकार घडवून आणले जाणिवपुर्वक माझी बदनामी करण्याच्या हेतूने रचलेले हे कट कारस्थान होत. तर आमच्या गटातून निवडून येऊन आम्हालाच विरोध करणारा संचालकाचा यामध्ये सहभाग आहे. परंतु तरीही दोन वर्षे कारखाना बंद झाल्यानंतर कारखाना चालू व्हावा. यासाठी मदत केली. परंतु मला विरोध करायचा म्हणून आजरा कारखान्यात राजकारण घडवून आणले. अनेक प्रश्न आहेत पण त्याचे उत्तर कोणी देऊ शकत नाहीत. कारखाना बंद काळात झालेल्या चोरीबाबत संशयित ३४ पैकी प्रथम ७ जणांची चौकशी व्हावी. बेरींग चोरीचा सोक्षमोक्ष लागेल. शेवटी आमची आघाडी कायम राहील असे श्री चराटी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जंयवराराव शिंपी म्हणाले होऊ घातलेल्या सर्वच निवडणुका आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर निवडणूका लढवून जिंकायच्या आहेत. यासाठी आपण सर्वांनी ताकतीनिशी उभे राहिले पाहिजेत. येणाऱ्या काळात तालुक्यातील तिन्ही धरणाचा पाणीसाठा चांगला आहे तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात सहकारी संस्था नामशेष झाल्या आहेत. तसा आजरा तालुक्यातील होऊ नये तालुक्यातील सरकार चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी आमचा प्रयत्न कायम राहील. असे श्री शिंपी म्हणाले. यावेळी विजयकुमार पाटील मनोगत करताना म्हणाले तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने चराटी गट व शिंपी गट विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून एकत्र आले आहेत. आपण सर्वांनी चराटी – शिंपी गट आघाडी सोबत राहून येणाऱ्या सर्व निवडणुका ताकतीने लढवूया व जिकुया. असे श्री. पाटील म्हणाले.
[ नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले जिल्हा बँकेच्या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. पुन्हा जोमाने उभा राहणार जिल्हा बँक निवडणूक जिल्ह्याच्या नेत्यांनी हातात घेतली परंतु त्यांना काय घासावी लागली ते त्यांनाच माहिती आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना कोणताही थारा द्यायचा नाही. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना बाजूला ठेवून बहुजनांसाठी पुढे येवून काम करुया व सेवा संस्थेच्या माध्यमातून दुग्धक्रांती – आणि हरितक्रांती घडवूया. असे श्री. शिंपी म्हणाले.]
सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन सर्व संचालक उपस्थित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आजरा अर्बनचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, जि. प. सदस्या सुनिता रेडेकर, नगराध्यक्षा ज्योस्त्ना चराटी, उप. नगराध्यक्षा संजीवनी सावंत, उद्योजक रमेश रेडेकर, संचालक आनंदराव कुलकर्णी, दशरथ अमृते, नगरसेवक किरण कांबळे, आजरा बॅक, आजरा सुतगिरणीचे सर्व संचालक चराटी – शिंपी गटाचे सेवा संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक सरपंच उपसरपंच दोन्ही गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर कांबळे (सर) यांनी केले. तर आभार डॉ. इंद्रजीत देसाई यांनी मानले
