Homeकोंकण - ठाणेआजऱ्यातील छत्रपती.शिवाजी महाराज मुर्तीचे काम अंतीम टप्प्यात.

आजऱ्यातील छत्रपती.शिवाजी महाराज मुर्तीचे काम अंतीम टप्प्यात.

आजऱ्यातील छत्रपती.शिवाजी महाराज मुर्तीचे काम अंतीम टप्प्यात.

आजरा प्रतिनिधी.

आजरा शहराची शान वाढवणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ मुर्ती अंतीम टप्प्यात असून लवकरच याचे अनावरण होणार असल्याची माहिती अध्यक्ष बापू टोपले व समितीने दिली.
आजरा शहरात उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. केवळ चेहऱ्याचे काम बाकी आहे.या कामाची पाहणी करुन अंतीम करण्यात येणार आहे.लवकरात लवकर हा पुतळा आजऱ्याच्या वैभवात भर घालणार आहे.कोरोनाकाळात व निधी अभावी या पुतळ्याचे काम थोडे रेंगाळले होते. आतापर्यंत या कामासाठी ६७ लाख ५० हजार पर्यंत खर्च झालेला आहे.याकामी खासदार संजय मंडलिक, आजरा नगरपंचायत यांच्या वतीने निधी व तालुक्यातील संस्था व नागरीकांनी देणगी दिली आहे.केवळ या देणगीतूनच हे काम होत आहे. साडे अकरा फुट उंचीचा हा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. यासह परिसरातील सुशोभीकरण ही झाले आहे. या बैठकीला जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अशोक चराटी, मुकूंद देसाई, मारुती मोरे, संभाजी इंजल, प्रकाश वाटवे, विजय पाटील ,विलास नाईक, आनंदा कुंभार, दिवाकर नलवडे, बंडोपंत कातकर, संजयभाऊ सावंत, बशीर मुल्ला हे समिती सदस्य उपस्थित होते.

देणगीसाठी समितीचे आवाहन पुतळ्याचा एकूण होणारा खर्च पाहता व जमा झालेली रक्कम यामध्ये तफावत आहे. शेवटच्या कामासाठी व इतर देणी यासाठी अजूनही रक्कमेची आवश्यकता आहे. नागरीक, संस्था, उद्योजक यांनी मदत द्यावी. असे आवाहन समितीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.