Homeकोंकण - ठाणेआजरा. - बहिरेवाडीत मारामारी, दोघे जखमी. -दारात खडी पसरलेच्या कारणावरून.. वादाचे पडसाद....

आजरा. – बहिरेवाडीत मारामारी, दोघे जखमी. -दारात खडी पसरलेच्या कारणावरून.. वादाचे पडसाद. मारामारीत.

आजरा. – बहिरेवाडीत मारामारी, दोघे जखमी. –
दारात खडी पसरलेच्या कारणावरून.. वादाचे पडसाद. मारामारीत.

आजरा. – प्रतिनिधी.

बहिरेवाडी ता.आजरा येथील दत्तात्रय शंकरनाथ डवरी यांच्या घरासमोरील खडी भरुन नेताना जाब विचारल्याच्या कारणावरुन दि. ४ रोजी दोन कुटूंबात मारामारी झाली यामध्ये वडील व मुलगी जखमी झाले आहेत. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डवरी हे मुमेवाडी (ता.आजरा) येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.
डवरी यांनी घर बांधकामासाठी खडी आणली होती. ही खडी रस्त्यामध्ये असल्याने रामचंद्र हरी जोंधळे यांनी ट्रॅक्टर मध्ये भरुन जात होते यावेळी डवरी यांनी याबद्दल जाब विचारला असता तू अजून रस्त्यातील खडी का बाजूला केली नाहीस. असे जोंधळे यांनी सांगत शिवीगाळ केली. शिवीगाळ करु नका, आम्ही उद्या खडी भरून घेतो असे सांगत असताना रामचंद्र जोंधळे याने हातातील खोरे डवरी च्या डावे गालावर मारुन जखमी केले. तसेच दिपक जोंधळे व पुंडलिक जोंधळे या दोघांनी डवरीस काठीने मारहाण केली डवरी यांची मुलगी वैष्णवी देखील मारहाण केली. तिघांविरोधात उत्तूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.