Homeकोंकण - ठाणेजनता सहकारी बँकेची आर्थिक वाटचाल भक्कम.- व्यवसाय ९०० कोटींच्या पुढे.- सभासदांना १०...

जनता सहकारी बँकेची आर्थिक वाटचाल भक्कम.- व्यवसाय ९०० कोटींच्या पुढे.- सभासदांना १० टक्के लाभांश मंजूर.- वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

जनता सहकारी बँकेची आर्थिक वाटचाल भक्कम.- व्यवसाय ९०० कोटींच्या पुढे –
सभासदांना १० टक्के लाभांश मंजूर.- वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

आजरा : प्रतिनिधी.

जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुरंडेश्वर कार्यालय, वाणी गल्ली, आजरा येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात चेअरमन व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सभासदांना ऑनलाइन व्यवहार करताना दक्षता घेण्याबाबत सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग देण्यात आले.
सभासदांचे स्वागत करून प्रास्ताविक बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले. त्यानंतर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचन केला.
बँकेची उल्लेखनीय प्रगती पाहता सभासदांनी चेअरमन, संचालक व सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. तसेच अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत व वेतनश्रेणीसंदर्भात सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. यावर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
बँकेचा व्यवसाय ९०० कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, आर्थिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर सभासदांनी १० टक्के लाभांश मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला. सभासदांच्या मंजुरीने टाळ्यांच्या गजरात या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
यावेळी बँकेचे सभासद बाबासाहेब देवकर, रा. कोल्हापूर, तानाजी देसाई, रा. पेठणळी व. आनंदा पाटील, रा. मुरगूड यांनी बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल चेअरमन, संचालक व सर्व स्टाफचे अभिनंदन करून अभिनंदनाचा ठराव मांडला.

सभेस जि. प. सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, तसेच कारखाना माजी चेअरमन वसंतराव धुरे, संचालक दिपक देसाई तसेच बँकेचे व्हा. चेअरमन अमित सामंत, संचालक महादेव टोपले, जयवंत कोडक, राणजीत देसाई, बाबाजी नाईक, जयवंत कोडक, प्रशांत पाटील, विक्रमसिंह देसाई, सौ. रेखा देसाई, नंदू केरस्कर, महेश कांबळे, पांडुरंग तारळे, संतोष पाटील तसेच बँकेचे तज्ज्ञ संचालक अॅड. एस. एस. निकम, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील, असिस्टंट मॅनेजर पी. ए. सरंबळे, सिनिअर ऑफिसर माणिक सावंत, सुहास चोगुले यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संतोष पाटील यांनी मानले.

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बँकेचे सभासद व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई यांनी सभासद व कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न उपस्थित करत बँकेने केलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच कामगारांना वेतन वाढ व शिपाई व कर्मचारी यांना यांना त्यांच्या कार्यकाला प्रमाणे पदभार वाढून मिळावा अशी मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.