माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये. – चंदगड नगरपंचायत राज्यात चौथी .तर आजरा नगरपंचायत नववी
चंदगड. – प्रतिनिधी.

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये चंदगड नगरपंचायत राज्यात चौथ्या क्रमांकावर समावेश आहे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण व जतन करण्यासाठी चंदगड शहराने केलेल्या या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने चंदगड नगरपंचायत सर्व टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा दि. ५ जून २०२२ रोजी स. १०.३० वा. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगर विकास मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पर्यावरण मंत्री यांच्या उपस्थितीत टाटा थिएटर एन.सी.पी.ए नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
राज्यात चंदगड नगरपंचायत नगराध्यक्षा प्राची दयानंद कानेकर यांच्या व त्यांच्या पूर्ण टीमच्या कार्याची व पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण जतन केल्याची दखल घेऊन राज्यात चौथा क्रमांक देण्यात आलेला आहे. यामुळे चंदगड तालुक्यात नगराध्यक्षा सौ काणेकर यांच्या टीमचे कौतुक होत आहे.
