माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये. – चंदगड नगरपंचायत राज्यात चौथी.
चंदगड. – प्रतिनिधी.

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये चंदगड नगरपंचायत राज्यात चौथ्या क्रमांकावर समावेश आहे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण व जतन करण्यासाठी चंदगड शहराने केलेल्या या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने चंदगड नगरपंचायत सर्व टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा दि. ५ जून २०२२ रोजी स. १०.३० वा. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगर विकास मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पर्यावरण मंत्री यांच्या उपस्थितीत टाटा थिएटर एन.सी.पी.ए नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. या अभियानात राज्यात १३७ नगरपंचायत यांनी सहभाग घेतला होता.
राज्यात चंदगड नगरपंचायत नगराध्यक्षा प्राची दयानंद कानेकर यांच्या व त्यांच्या पूर्ण टीमच्या कार्याची व पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण जतन केल्याची दखल घेऊन राज्यात चौथा क्रमांक देण्यात आलेला आहे. यामुळे चंदगड तालुक्यात नगराध्यक्षा सौ काणेकर यांच्या टीमचे कौतुक होत आहे.
