Homeकोंकण - ठाणेअखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च...

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च पर्वती पुणे महाविद्यालयात टेक ट्रान्स्फर पुस्तिकेचे प्रकाशन. – उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च पर्वती पुणे महाविद्यालयात टेक ट्रान्स्फर पुस्तिकेचे प्रकाशन. – उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.

पुणे. – प्रतिनिधी.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च पर्वती पुणे महाविद्यालयात टेक ट्रान्स्फर पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मांडलेल्या नवकल्पनांचे संकलन केले आहे. या नवकल्पना वेगवेगळ्या इंडस्ट्रीजच्या मदतीने भविष्यात स्टार्टअप्समध्ये रुपांतरीत करण्याचा मानस आहे. या प्रसंगी इनक्युबेशन सेंटरसाठी स्थापन करण्यात आलेल्या सेक्शन ८ कंपनीच्या तज्ञ संचालकांशी चर्चा करून उद्योगक्षेत्राची गरज ओळखून पेटंट, स्टार्टअप्स आणि इनक्युबेशन सेंटरची धोरण निश्चिती करण्यात आली. महाविद्यालयामध्ये इनोव्हेशन क्लबच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या संशोधन प्रकल्पांच्या प्रस्तावाविषयी माहिती दिली. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या संकुलातील विद्यार्थी व शिक्षकाना संशोधनास चालना व मार्गदर्शन देऊन त्यांच्या कल्पनांचे स्टार्टअप्समध्ये रुपांतर करण्यासाठी. सेक्शन ८ कंपनीची मदत होणार आहे. महाविद्यालयामध्ये चाललेल्या विविध संशोधन प्रकल्पांविषयी उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड, ॲड भगवानराव साळुंखे, डॉ.एन.बी.पासलकर, श्री.प्रकाश जगताप, उदय जाधव, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, टेकट्रान्स्फर पुस्तिकेचे समन्वयक प्रा.निलेश जाधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.