मराठी शाळा चोरीला गेले बाबत आजरा. – किणे – चाळोबावाडी ग्रामस्थांचे मुख्याधिकार्यांना निवेदन. – गलथान कारभाराची चौकशी करा.
आजरा. प्रतिनिधी.
मौजे किणे तालुका आजरा येथील ग्रामपंचायत मध्ये चाळोबावाडी गावच्या चारशे लोक वस्ती असलेल्या गावापासून अंदाजे चार किलोमीटर चाळोबावाडी या गावाची समाज वसलेला आहे. स्वतंत्र काळापासून आज अखेर या गावात शिक्षणाची कोणतीही सुविधा किंवा शाळा इमारत नाही. फक्त बालवाडी चालू असून इयत्ता पाचवी पर्यंत मुले एकाच भाडोत्री खोलीत इमारतीत शिक्षण घेत आहेत. या वाडीमध्ये १९९७ शासनाकडून एक खोली शाळा इमारत मंजूर झाली त्यावेळी सरपंच पांडुरंग दळवी गट नंबर ६५७ या जागेमध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण केले इमारत अस्तित्वात आहे. परंतु पं. स. बांधकाम विभाग व प. स शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इमारतीचा ताबा घेऊन ग्रामपंचायत विभागाकडे हस्तांतरीत न करता शासनाचे सर्व मंजूर पैसे खर्च मात्र केले व बाबू वांजळे जयसिंग वांजळे पत्नी तुळसाबाई यांच्या ताब्यात इमारतीसह देऊन ते सध्या अनधिकृतपणे बेकायदेशीर रीत्या त्याचा राजरोस वापर करून करत असून विद्यार्थी लहान मुले देशोधडीला वाऱ्यावर फिरत आहेत . प्रशासकीय अधिकारी प. स. आजरा यांना ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा संबंधितावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई किंवा फौजदारी कारवाई झालेली नाही आज सुद्धा १९९७ ते आजअखेर शिक्षणाची मोठी चेष्टा असणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांच्यामार्फत शिक्षणापासून वंचित व दुर्लक्षित राहिलेल्या डोंगराळ भागात गरीब लहान मुलांना न्याय मिळवून देऊ परंतु जे वरील सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्या शाळेच्या इमारतीच्या प्रत्यक्ष वापर करतात त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशा आशयाचे निवेदन निवेदन गटविकास अधिकारी आजरा यांना किणे चाळोबावाडी ग्रामस्थ यांनी दिलेले आहे. या निवेदनाच्या प्रती ग्राम विकास मंत्री, गटविकास अधिकारी उपअभियंता बांधकाम विभाग, गटशिक्षण अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर वसंत नाईक, विजय नाईक, अनिल वांजोळे, साधना वांजोळे, संजय गावडे सुरेश वांजोळे दिपक नाईक, दयानंद नाईक, सुबराव नांदवडेकर, बाबू पालपोकर, बायका कांबळे, दीपक वांजोळे पांडुरंग वांजोळे जयसिंग वांजोळे मंगल वांजळे सुधाकर नाईक प्रमोद कांबळे सह ४५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत
