आजरा सूतगिरणीच्या कामगारांना वेजबोर्ड लागू. – संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय.
आजारा. – प्रतिनिधी.

अण्णा – भाऊ आजरा सूतगिरणीच्या कामगार कर्मचारी यांना वेज बोर्ड लागू करीत असल्याचे संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी जाहीर केले सूत गिरणी कामगार कर्मचारी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा. व त्यांचे राहणीमान उंचवावे तसेच १ मे कामगार दिनाच्या कामगारांना अमुल्य अशी भेट म्हणून सूत गिरणीच्या कामगार कर्मचारी यांना वेज बोर्ड च्या तरतुदी लागू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे सांगितले. आजरा सुतगिरण कामगार संघटनेची बोलताना श्री चराटी म्हणाले आजरा सूत गिरणीचे संस्थापक कै. काशिनाथ सराटी कै. माधवराव देशपांडे यांचे आशीर्वाद तसेच सूतगिरणीच्या अध्यक्ष अन्नपूर्णा चराटी व्हा. चेअरमन अनिल देशपांडे आणि सर्व संचालक मंडळ यांचे निरंतर मार्गदर्शन त्याचप्रमाणे संस्था आपली आहे. ही भावना रुजण्यासाठीचे संस्कार आणि यासाठीशी धडपड याचप्रमाणे संस्थेचे जनरल मॅनेजर अमोल वाघ यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी यांनी सातत्याने केलेले नियोजन व कर्मचारी कामगार यांची मोठी साथ यामुळे संस्थेची वाटचाल सुरू ठेवली आहे कोव्हिड लॉकडाऊन नंतर काही कालावधी वस्त्रोद्योगासाठी दिलासादायक ठरला होता परंतु गेल्या काही महिन्यापासून सुतगिरणीस आवश्यक असणारा कच्चामाल कापसाच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ झाल्यामुळे सहा महिन्यापूर्वी ४५ हजार रुपये खंडी मिळणारा कापूस आज १ लाख १५ हजार रुपयेला पोहोचला आहे. व त्याच प्रमाणात सुताचे दर वाढलेले नाहीत व त्यामुळे सूत गिरणीसाठी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु तरीदेखील कामगार कर्मचारी यांचे नुकसान टाळण्यासाठी सूतगिरणी सातत्याने सुरू ठेवण्याची धडपड सुरू आहे. कापसाअभावी उद्योग बंद ठेवावे लागत आहेत. तसेच कापूस दरवाढीमुळे एक वस्त्रउद्योगाची वाटचाल नकारार्थी व भीतीदायक वातावरणातून सुरू असताना देखील वाढत्या महागाई मध्ये आशेचा किरण कामगार कर्मचारी यांना दिसावा असा विचार सूतगिरणीच्या कामगारांसाठी वेजबोर्ड लागू करीत आहोत असे सांगितले. यावेळी
व्हा. चेअरमन डॉ. देशपांडे म्हणाले सूतगिरणीच्या वाटचालीमध्ये कामगार कर्मचारी यांनी जास्तीत जास्त हजर दिवस भरून योगदान दिले पाहिजे असे आवाहन केले व सध्या अडचणीतून मार्गक्रमण करत असताना देखील कामगारांसाठी वेजबोर्ड लागु करीत आहोत. असे सांगितले. या प्रसंगी सूतगिरणीच्या अध्यक्ष अन्नपूर्णा सराटी संचालक शंकर टोपले, जयसिंग देसाई, अविनाश सोनटक्के, रजनीकांत नाईक, नारायण मुरुकटे, जी. एम. पाटील राजू पोतनीस, डॉ. इंद्रजीत देसाई सुधीर कुंभार, संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, मारुती शेवाळे मनीषा कुरुनकर, हसन शेख सूतगिरणीचे जनरल मॅनेजर अमोल वाघ, चीफ अकाउंटंट विष्णू पवार अधिकारी सचिन सटाले, राजेंद्र धुमाळ, आर. ए. पाटील, श्रीकांत कुलकर्णी सह कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी सर्व कामगारांच्या वतीने व्यवस्थापनाचे आभार मानले.
