Homeकोंकण - ठाणेतुमच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त. - तुम्हीच करा. - आजरा कोवाडेत वन विभाग...

तुमच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त. – तुम्हीच करा. – आजरा कोवाडेत वन विभाग – शिवसेना शेतकरी ग्रामस्थांची बैठक संपन्न.

तुमच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त. – तुम्हीच करा. – आजरा कोवाडेत वन विभाग – शिवसेना शेतकरी ग्रामस्थांची बैठक संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

तुमच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तुम्हीच करा असा संदेश शेतकऱ्यांनी आजरा कोवाडेत वन विभाग – शिवसेना शेतकरी ग्रामस्थांची बैठक दिला. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताबडतोब मिळावी अशा आशयाचे निवेदन परिक्षेत्र वन अधिकारी आजरा यांना आजरा शिवसेना यांनी दिले होते या अनुषंगाने ही बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कोवाडे सरपंच मनोहर जगदाळे होते.
स्वागत ग्रामसेवक अंकुश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार यांनी केले श्री पोवार म्हणाले आजरा तालुक्यातील हजगोळी, पेद्रेवाडी, कोवाडे, दाभेवाडी होनेवाडी, सह तालुक्यातील इतर काही भागात गव्हे व हत्ती यांचा धुमाकूळ सत्र चालू अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे फळझाडांचे पोल्ट्री शेड व इतर बाबींचे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने काय उपाय योजना केली यासाठी शेतकरी व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत व तालुक्यातील प्रमुख अधिकारी शेतकरी सोबत य संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा. यावेळी आजरा साखर चेअरमन सुनिल शिंत्रे बोलताना म्हणाले वन विभागाची जनावरे तुमच्या जंगलात ठेवा तुम्ही सांभाळा कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असाल तर कार्यालयात केव्हा असता हेदेखील सांगावे आपण जंगलामध्ये हत्ती गवत लावून गव्हे व हत्ती सांभाळा परंतु शेतकऱ्यांच्या या पिकाचे नुकसान होऊन आपण काडीमोड नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत असाल तर यासाठी आपण प्रथम आपल्या वन्य प्राण्यांचा बंदोबस आपणच करावा असे यावेळी बोलताना श्री शिंत्रे म्हणाले. या चर्चेत शिवसेना उपतालुका प्रमुख संजय येसादे, शेतकरी संघटना ता उपाध्यक्ष संजय देसाई तसेच सुनील डोंगरे, नागोजी व्होरटे सह कोवाडे, हजगोळी, मलिग्रे, दाभेवाडी येथील शेतकऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला.
वनाधिकारी स्मिता डाके त्यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आपल्याला आपले वन्य प्राणी आपल्या जंगलात सांभाळता येत नसतील तर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा व यासाठी लागणारी उपायोजना करा परंतु तुमचे वन्य प्राणी तुमच्या जंगलात ठेवा. अन्यथा आम्हाला वन विभागावर मोर्चा काढावा लागेल आपण महिला अधिकारी असल्यामुळे आम्ही एक पाय मागे येत आलो आहोत. यापुढे आपल्याला जर तालुक्यात चांगल्या पद्धतीने काम करायचे असेल तर प्रथम वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा वनविभागाच्या भोवती व परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून हत्ती फिरत आहे आपण याबाबत काय केला हे येथील शेतकऱ्यांना सांगा परंतु आपले काम समाधानकारक नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली.

[ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना परिक्षेत्र वन अधिकारी आजरा स्मिता डाके म्हणाल्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपायोजना शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. आमचा वन्यप्राण्यांना शेतामध्ये येऊ नये व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरीही वन्य प्राणी आपल्या शेतामध्ये येऊन नुकसान केल्यास ताबडतोड त्याचा पंचनामा करून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमची यंत्रणा काम करत असते. परंतु नियमांमध्ये आम्हाला बदल करता येत नाही याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलावे असे सौ डाके बोलताना म्हणाल्या. ]

यावेळी संयुक्त बैठकिला ग्रामपंचायत सदस्या किरण साळी, सदस्य संतोष चौगुले, तसेच धनंजय सावंत, नारायण मुरकुटे, तुकाराम सावंत, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, सुनील चव्हाण, संताजी डोंगरे, नारायण कांबळे सह शेतकरी उपस्थित होते. आभार संजय देसाई यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.