पोलिओ डोस जागे अभावी पारेवाडी उपकेंद्रात – का.? लाभार्थी माताची होते फरपट – आरोग्य विभागाकडे जागेची उपलब्धता ❓ नाही.
आजरा. – प्रतिनिधी.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून लहान बालकांना पोलिओ डोस दिला जातो. यामध्ये मासिक लसीकरण,बाळाची बी. सी. सी, फेन्टा फल्स, सेंकट डोस, बुस्टर डोस असे वेगवेगळे डोस दिले जातात. हा डोस महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी दिला जाणारा डोस हा प्रत्येक गावातील आरोग्य विभागाच्या उपकेंद्रात किंवा ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी दिला जातो परंतु आजरा तालुक्यातील आजरा शहरातील लहान बालकांना दिला जाणारा पोलिओ डोस आजरा शेजारी असणाऱ्या पारेवाडी या उपकेंद्रात देण्यात आला. आजरा शहरातील लाभार्थी माता आपले बालक घेऊन आजरा शहरापासून पारेवाडी गावात असलेल्या उपकेंद्रात जाऊन आपल्या बालकाला डोस घेऊन आल्या यामुळे आजरा शहरातील माता आजरा शहरात असणारे विविध शासकीय इमारती असताना जागा उपलब्ध होत नसल्याने पारेवाडी उपकेंद्र येथे घेण्यात आलेला पोलिओ डोस याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत काही माता यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्याकडून असे समजले की यापूर्वी आजरा येथील कुमार भवन या ठिकाणी पोलिओ डोस व इतर लसीकरण केले जात होते. परंतु त्याठिकाणी काही कारणास्तव इमारत उपलब्ध न झाल्याने हा डोस पारेवाडी या गावात पोलिओ डोस देण्यासाठी मातांना निरोप देण्यात आला होता. यामुळे उन्हाच्या तडाख्यात माता-पालक आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन पारेवाडी गावात जाऊन डोस घेतला असल्याचे सांगितले. ३ मे पासून तीन – चार आठवडे या उपकेंद्रात लाभार्थीची फरपट होत आहे. याकडे नगरपंचायचा देखील कानाडोळा होत आहे. हा त्रास आशा वर्कर, कर्मचारी यांना देखिल होत. तालुक्याच्या ठिकाणापासून उपकेंद्रात जाऊन लाभार्थीमाताना लाभ द्यावा लागत आहे.
{ याबाबत आरोग्याधिकारी यशवंत सोनवणे यांना विचारले असता त्यांनी आजरा शहरात जागा उपलब्ध न झालेने फक्त एक वेळ मंगळवार रोजी पारेवाडी येथे हा मासिक लसीकरण डोस देण्यात आला यापुढे आजरा नगरपंचायत यांनी नगरपंचायत सभागृहामध्ये जागा देणे बाबत मान्य केले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी श्री सोनवणे यांनी बोलताना सांगितले. }
याबाबत आजरा शहरातील माता-पालक आरोग्य विभागा बाबत नाराजी व्यक्त करत आहेत. आजरा हा तालुका असून शहरांमध्ये अनेक शासकीय इमारती आहेत असे असताना देखील आजरा शहरापासून तीन किलोमीटर असलेल्या पारेवाडी उपकेंद्रात डोस देण्याचे नेमके कारण काय याबाबत अधिक माहिती समजली नाही. यापुढे कायमस्वरूपी यापुढे आजरा नगरपंचायत मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे कारण यामध्ये लाभार्थी माता व बालकांची फरपट होत आहे. हे मात्र निश्चित. याकडे आजरा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते.