संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून संभाजीराजेंना पाठिंबा.
मुंबई. – प्रतिनिधी.
संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून संभाजीराजेंना पाठिंबा. –
म्हणाले, “इतर पक्षांचे…”“मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला,”असं म्हणत संभाजीराजेंनी शिवसेनेचा पाठिंबा न मिळाल्याबद्दल खेद व्यक्त केलाय.
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेनं पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला नकार दिला. शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. मात्र संभाजीराजेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीत वैचारिक मतभेद असल्यांच चित्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे.
राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे आता संभाजीराजे छत्रपती पुन्हा खासदार होणार नाहीत हे स्पष्ट झालंय. यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भातही उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. “मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला,” असं म्हणत संभाजीराजेंनी शिवसेनेचा पाठिंबा न मिळाल्याबद्दल खेद व्यक्त केलाय.
