बेशिस्त वाहन पार्क करून रस्ता वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहन धारकांवर वेंगुर्ला वाहतूक पोलिसांची ई -चलन मशीन द्वारे कायदेशीर कारवाई.
वेंगुर्ले :- प्रतिनिधी.
वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे वाहतूक अंमलदार मनोज परुळेकर व त्यांचे सहकारी अंमलदार पांडुरंग खडपकर यांनी बेसिस्त वाहन पार्क उगरला कायदेशीर कारवाहीचा बडगा
वेंगुर्ला नगरपालिकेने गाडीअड्डा ते सारस्वत बँक हा वन साईड नो पार्किंग झोन जाहीर केला आहे.तसेच नगरपालिकेच्या खाली अंदरग्राऊंड पार्किंगची सोय केलेली आहे व त्या बाबत नो पार्किंगचे बोर्ड व पार्किंगचे बोर्ड बाजारपेठेत लावण्यात येत आहेत.तर “नो पार्किंग” मध्ये वाहने लावणाऱ्या वाहन चालक मालकानं विरोधात ई चलन मशीन द्वारे दंड करून नो पार्किंग व राहादारीस अडथळा पोलीस इशारा तोडणे अशा विविध मोटार अधिनियमांच्या कायद्यानुसार वेंगुर्ला नगर पालिकेच्या हद्दीत वाहतूकव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी वेंगुर्ला कोर्टात प्रकरणे पाठवून तसेच ई चलन मशीन द्वारे दंड वसुल करून घेत आहेत. पोलिसांच्या कामगिरीवर सर्व सामान्य जनता खुश असून पोलिसांना भेटून त्यांच्या कामगिरी बद्दल कौवतुक करताना दिसत आहे.
वेंगुर्ला नगर पालिकेने पार्किंगच्या ठिकाणी बेशिस्त वाहन पार्किंग करून निघून जाणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी व पार्किंग व्यवस्थीत करून घेण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. पे पार्किंग झाल्यास नगर पालिकेच्या उत्पनात भर पडू शकते. तसेच चारचाकी वाहन पार्किंग आतमध्ये व्यवस्थित होऊन चारचाकी वाहन पार्किंगचा प्रश्न कायमचा मिटू शकतो ही नागरिक खासगीत भावना बोलून दाखवताना दिसत आहेत.तर माल वाहतूक वाहनाना माल उतरण्यासाठी नगरपालिकेने जागा व वेळ ठरवून देणे गरजेचे आहे ते होताना दिसत नाही तसेच रविवार च्या बाजारात रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाऱ्यानवा कारवाही करताना नगरपालिकेचे कर्मचारी दिसत नाहीत यावरही नागरिक खाजगी नाराजी व्यक्त करताना वेंगुर्ला वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर पांडुरंग खडपकर व त्याचे सहकारी होमगार्ड तुषार केळुसकर व सेटकर यांचे कौतुक करताना दिसत आहेत.
