कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोमवार दि २३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर – नाम हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली यल्गार मोर्चा.
( वाढत्या महागाई व ओबीसी आरक्षण बाबत मोर्चा. )
कोल्हापूर. – प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोमवार दि २३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर नाम. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली यल्गार मोर्चा होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे प्रदेशाध्यक्ष नाम जयंत पाटील यांच्या आदेशास अनुसरुन नेते नाम हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाई व ओबीसी आरक्षण संदर्भातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने सोमवार दि २३ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ११.वा जिल्हाधिकारी कार्यालयावर यल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे यावेळी मान्यवर नेतेगण व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि पदाधिकारी, जिल्हा सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, नगरपालिका क्षेञ शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी,सहकारी संस्थांचे संचालक व पदाधिकारी यांनी आपआपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने घेऊन वेळेत उपस्थित रहावे असे अवाहन जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(ग्रामीण) कोल्हापूर. यांनी केले आहे.
