Homeकोंकण - ठाणेमहाआरोग्य शिबिरात - १ हजार ६९७ रुग्णांची तपासणी, ३०९ रुग्ण संदर्भित.( आजरा...

महाआरोग्य शिबिरात – १ हजार ६९७ रुग्णांची तपासणी, ३०९ रुग्ण संदर्भित.( आजरा शहराचे – नगराध्यक्ष व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त महाआरोग्य शिबीर.🟣आजरा तालुक्यात महिला सक्षमीकरणाला नवी दिशा.

🟣महाआरोग्य शिबिरात – १ हजार ६९७ रुग्णांची तपासणी, ३०९ रुग्ण संदर्भित.
( आजरा शहराचे – नगराध्यक्ष व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त महाआरोग्य शिबीर.
🟣आजरा तालुक्यात महिला सक्षमीकरणाला नवी दिशा.

🟣महाआरोग्य शिबिरात – १ हजार ६९७ रुग्णांची तपासणी, ३०९ रुग्ण संदर्भित.
( आजरा शहराचे – नगराध्यक्ष व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त महाआरोग्य शिबीर.

आजरा : प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस गौरव समितीने
महाआरोग्य शिबिराने आयोजिन केले होते. या महाआरोग्य शिबिराचा नागरिकांना लाभ घेता आला.

दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनात या शिबिरामध्ये एकूण १ हजार ६९७ रुग्णांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३०९ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू, डोळ्यांचा नंबर, कान-नाक-घसा, श्रवणयंत्र तपासणी, स्त्रीरोग, मूत्ररोग, संशयित कर्करोग, सिकलसेल, हृदयरोग, अस्थिरोग, आयुष, बालरोग, जनरल सर्जरी, डेंटल तसेच प्रयोगशाळा तपासणी अशा विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
शिबिरात अनेक रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले, तर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.
शिबिराची माहिती ग्रामीण रुग्णालय आजरा यांच्याकडून माहिती देण्यात आली असून, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय आजरा यांच्या स्वाक्षरीने अहवाल सादर करण्यात आला आहे.

🟡आजरा तालुक्यात महिला सक्षमीकरणाला नवी दिशा.
( ‘रणरागिणी’ व ‘सह्याद्री’ महिला प्रभाग संघांचा उद्घाटन व वास्तू प्रवेश सोहळा उत्साहात.)

आजरा – प्रतिनिधी.

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘रणरागिणी महिला प्रभाग संघ, आजरा’ व ‘सह्याद्री महिला प्रभाग संघ, कोळींद्रे’ या नूतन प्रभाग संघांचा उद्घाटन आणि वास्तू प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘उमेद’ अभियानांतर्गत आजरा तालुक्यात दोन महत्त्वाच्या महिला प्रभाग संघांची स्थापना करण्यात आली आहे. या नूतन प्रभाग संघांच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि वास्तू प्रवेश सोहळा मंगळवार दिनांक १०/११/२०२६ रोजी अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील विविध बचत गटांच्या महिला, ग्रामसंघांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचायत समिती सभापती माननीय यशोदा पवार यांचे प्रेरणादायी मनोगत.

या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समितीच्या सभापती माननीय यशोदा पवार उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरता या विषयांवर अत्यंत मोलाचे विचार मांडले.

आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की, “आजची ग्रामीण महिला केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती कुटुंबाचा आणि समाजाचा आर्थिक कणा बनत आहे. ‘उमेद’ अभियानाने महिलांना एकत्र येण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.”

महिला सबलीकरणाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी पुढे नमूद केले की, जेव्हा एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा तिचा केवळ आत्मविश्वासच वाढत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे राहणीमान सुधारते आणि मुलांच्या शिक्षणाला व आरोग्याला योग्य दिशा मिळते.

आत्मनिर्भरतेचा संदेश आणि संघटन शक्ती

आत्मनिर्भर महिलांची संकल्पना स्पष्ट करताना माननीय यशोदा पवार यांनी बचत गटांमधील महिलांना पारंपरिक शेतीपूरक व्यवसायांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून नवनवीन लघुउद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. प्रक्रिया उद्योग, हस्तकला, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या प्रभाग संघांचा प्रभावी वापर करावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

“संघटन शक्तीमध्ये मोठी ताकद असते. रणरागिणी आणि सह्याद्री महिला प्रभाग संघांच्या माध्यमातून आजरा आणि कोळींद्रे परिसरातील हजारो महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

🟣नूतन वास्तूमुळे कामकाजाला मिळणार नवी गती.

या दोन्ही प्रभाग संघांना स्वतःची हक्काची व सुसज्ज वास्तू मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या नवीन कार्यालयांमुळे महिलांच्या बैठका, विविध प्रशिक्षण शिबिरे, आर्थिक व्यवहारांचे नियोजन आणि शासकीय योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे व गतिमान होणार आहे. या प्रभाग संघांचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि आदर्शवत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी सभापती माननीय यशोदा पवार यांच्या विचारांचे स्वागत केले आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला. सदरच्या कार्यालय मिळणेकामी मा. गटविकास अधिकारीसो मा. सुभाष सावंतसो, मा. शिरीष देसाई, मा. सुधीर देसाई, जिल्हा परिषद सदस्य, मा. समीर पारधे, मा. विकास चोथे पंचायत समिती सदस्य यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक मा. प्रवीण बोकडेसर यांनी प्रस्तावना केली तर आभार प्रदर्शन प्रभाग समन्वयक उषा पाटील यांनी केले. यावेळी प्रभागसंघ पदाधिकारी, केडर, गटातील महिला उपस्थित होते. यावेळी तालुका STAFF शांतारामसर, मिलिंदसर आणि सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या विशेष परिश्रमातून हा सोहळा यशस्वी झाला. हा सोहळा आजरा तालुक्यातील महिला चळवळीला एक नवी दिशा देणारा ठरला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.