Homeकोंकण - ठाणेजनता बँक व आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांचा उद्या वाढदिवस.{...

जनता बँक व आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांचा उद्या वाढदिवस.{ जनता सहकारी बँकेची विश्वासार्ह वाटचाल; ठेवीदारांचा दृढ विश्वास हीच यशाची पावती.}

जनता बँक व आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांचा उद्या वाढदिवस.
{ जनता सहकारी बँकेची विश्वासार्ह वाटचाल; ठेवीदारांचा दृढ विश्वास हीच यशाची पावती.}

आजरा : प्रतिनिधी.

जनता सहकारी बँक लि. आजरा व वसंतराव देसाई सहकारी साखर कारखाना, अमृतनगर (गवसे) चेअरमन मा. श्री. मुकुंदराव बळीरामजी देसाई यांचा उद्या, गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे. सहकार क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे देसाई यांनी जनता सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आर्थिक प्रगतीबरोबरच ग्राहकाभिमुख आणि आधुनिक बँकिंग सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


जनता सहकारी बँकेवर सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांनी दाखविलेला विश्वास ही बँकेच्या यशस्वी वाटचालीची खरी ताकद आहे. बँकेकडे सध्या ५१४ कोटी रुपयांच्या ठेवी असून ३४१ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय ८५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे बँकेने सलग ‘अ’ ऑडिट वर्ग कायम राखला असून शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळविले आहे. बँकेचे ७० हजारांहून अधिक खातेदार आणि ३५ हजारांहून अधिक सभासद आहेत. ही आकडेवारी बँकेवरील ग्राहकांच्या दृढ विश्वासाची साक्ष देणारी आहे.

याशिवाय विविध शासकीय आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांमधून तरुण उद्योजकांना कर्जसुविधा उपलब्ध करून देत स्वयंरोजगार आणि उद्योग उभारणीला बँकेकडून प्रोत्साहन दिले जात आहे. बँकेने जिल्ह्याबाहेरही आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार केला असून आधुनिक बँकिंग सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.


बँकेने पाडव्याला एका दिवसात १८ कोटी रुपयांच्या ठेवी संकलनाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. हा टप्पा म्हणजे ठेवीदार, सभासद, हितचिंतक आणि कर्मचारी वर्गाने बँकेवर दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. बँकेला विविध स्तरांवर सर्वोत्कृष्ट बँक, बेस्ट सीईओ आणि बेस्ट चेअरमन यांसारखे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
मुकुंदराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात निर्माण केलेली विश्वासार्हता आणि प्रगती कौतुकास्पद आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार क्षेत्रातील मान्यवर, सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.