रत्नागिरी दि.२० :- प्रतिनिधी.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 21 मे 2022:-रोजी सकाळी 09.00 वाजता पाली ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांसमवेत बैठक. (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी) दुपारी 12.00 वाजता चिंद्रवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन समारंभ. (स्थळ : चिंद्रवली, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 01.00 वाजता चांदेराई ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन समारंभ. ( स्थळ : चांदेराई, ता.जि. रत्नागिरी ) दुपारी 02.00 वाजता सोमेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन समारंभ. ( स्थळ : सोमेश्वर, ता.जि. रत्नागिरी ).
दुपारी 03.00 वाजता मिरजोळे विमानतळ विस्तारीकरणसाठी भुसंपादनबाबत चर्चा. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 03.30 ते 04.00 वाजता राखीव. दुपारी 04.00 वाजता कर्ला ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन समारंभ. (स्थळ : कर्ला, ता.जि. रत्नागिरी) सांयकाळी 06.00 वाजता शिवाई वाचनालय, नाचणे आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शिवाई वाचनालय, नाचणे, ता.जि. रत्नागिरी). रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्रौ 10.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
