गिरणी कामगारांचे राज्यभर जोडे मारो आंदोलन.
मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन. सर्व श्रमिक संघ.
आजरा. – प्रतिनिधी.

मुंबईचे हाँगकाँग सिंगापूर करण्याच्या धोरणाला गिरणी कामगाराला मुंबईतून बाहेर काढले व अनेकांना मुंबई सोडावी लागली पण गिरणी कामगार आंदोलनामुळे त्यांना मुंबईत घरांचा हक्क मिळवून दिला. आज काही बिल्डर्स धार्जिण्या संघटना शुक्राचार्य बनलेले अधिकारी गिरणी कामगारांचे मोबाईल पुनर्वसन होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत याबाबत गिरणी कामगार व वारसदारांना याची भावना तीव्र असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना व संघटनेने ना जोडे मारो आंदोलन गिरणी कामगार महाराष्ट्रभर करणार असून गिरणी कामगारांना घर मिळावे ही भावना आपण सतत व्यक्त केली आहे आपण या बिल्डर धार्जिन संघटना व झारीतले शुक्राचार्य बनलेले अधिकारी यांना थारा देऊ नये व गिरणी कामगाराला मुंबईत घर देऊन प्रश्न सोडवावा तसेच यासाठी आमच्या संघटनेचे नेते कॉम्रेड उदय भट कॉम्रेड बीके आंब्रे यांना चर्चेसाठी बोलवावे अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असण्याचे सर्व श्रमिक संघ कोल्हापूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन आजरा तहसीलदार कार्यालयात देण्यात आले आहे. यावेळी याठिकाणी जोडे मामारो आंदोलन करण्यात आले.
