Homeकोंकण - ठाणेकुडाळात कृषी प्रदर्शन संपन्न.( भाजप जि.प.माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व जि. प....

कुडाळात कृषी प्रदर्शन संपन्न.( भाजप जि.प.माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांची उपस्थिती. )

कुडाळात कृषी प्रदर्शन संपन्न.
( भाजप जि.प.माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांची उपस्थिती. )

कुडाळ :- प्रतिनिधी.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास आज जिल्हा माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी हजेरी लावली. या प्रदर्शनातील कृषी स्टॉल्स, कृषी अवजारे, बचतगट स्टॉल्स, पशु-पक्षी आदींची त्यांनी पाहणी केली.
मागील काही दिवस या कृषी मेळावा आणि पर्यटन महोत्सवावरून जिल्हा प्रशासनासहित शिवसेनेवर भाजप आणि त्यात विशेष करून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. मात्र, आज गोट्या सावंत आणि रणजित देसाई यांनी महोत्सव स्थळी भेट दिल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच कर्मचारी काहीशे गोंधळून गेले. याबाबत रणजित देसाई म्हणाले की, जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यासारखं वाटतंय. या प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील शेतकरी कारने येत असून यात महिला वर्गाचा अधिक समावेश आहे. त्यामुळे आपणास आनंद झालाय, असा उपरोधिक टोलाही देसाई यांनी लगावलाय. हा कृषी मेळावा संपन्न झाला की आपण बोलू, त्यात आर्थिक बाबींचा ही उल्लेख होईल, असंही ते म्हणाले
तसेच या महोत्सवासाठी ५४ लाखांचे बजेट असेल आणि बाहेरून यासाठी आर्थिक पुरवठा झाला असेल तर ही गंभीर बाब आहे. हे प्रदर्शन किंवा महोत्सव आपण मुद्दामहून पाहण्यास आलो असून हे या महोत्सवाचे ५ वे वर्षे आहे, यावर पुन्हा रणजित देसाई यांनी टिप्पणी केली. या प्रदर्शनाला आमचा विरोध नव्हता. पण सर्वांना विश्वासात घेऊन याचे नियोजन करता आले असते, असेही रणजित देसाई म्हणाले.
तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत म्हणाले की,पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रदर्शनाला केवळ गर्दी झाल्याचे भासविण्यात आले आहे. पण याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही निवडणुकीस तयार असल्याचे ते म्हणालेत. यावेळी जिल्हा परिषदेकडून गोट्या सावंत आणि रणजित देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे रुपेश कानडे, किरण गावकर आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.