Homeकोंकण - ठाणेआजरा कारखान्यात कर्मचारी व सामाजिक संस्थांच्या सहयोगातून श्रमदान शिबीर संपन्न.

आजरा कारखान्यात कर्मचारी व सामाजिक संस्थांच्या सहयोगातून श्रमदान शिबीर संपन्न.

आजरा कारखान्यात कर्मचारी व सामाजिक संस्थांच्या सहयोगातून श्रमदान शिबीर संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा सहकारी शेतकरी साखर कारखान्याच्या कामगार व कारखाना कार्यक्षेत्रातील स्वयंसेवक यांच्या वतीने कारखाना परिसर स्वच्छता व कारखाना परिसर वृक्षारोपण पावसा पूर्वीच्या पूर्वतयारीला बुधवार दि. १८/५/२०२२ रोजी सुरवात केली.
कर्मचारी व लोकदान यांचे माध्यमातून कारखाना परिसरातील कचरा, झुडपे, गवत, निरुपयोगी कचरा गोळा करणे इ. कामाचा समावेश केला आहे. या श्रमदान कार्यक्रमात कर्मचारी, तरुन मंडळे, स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भविष्यात झाडाची संख्या वाढण्यासाठी १०००० झाडे लावण्याचा मानस आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त स्वयंसेवक यांनी भाग घ्यावा. असे अवाहन चेअरमन यांनी केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत आजरा साखर कारखाना मध्ये दि. १८ रोजी कारखाना आवारातील कचरा गोळा करणे, कॉलनी आवार स्वच्छ करणे तसेच कारखाना कुंपण व्यवस्थित करणे त्याचप्रमाणे कारखान्यांमध्ये दहा हजार वृक्ष लागवड साठी खड्डे मारणे कारखाना कार्यक्षेत्रात वाटनेसाठी १०००० सीडबॉल तयार करणे इत्यादी कामे करण्यासाठी श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय वसंतराव देसाई यांच्या पुतळ्याचे पूजन संचालक विष्णुपंत केसरकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी श्री केसरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला कारखाना अनंत अडचणीतून उभारला आहे. मागील दोन हंगाम बंद राहिला असताना अनेक लोकांच्या व सहकारी संस्थांच्या सहकार्यातून पुन्हा सुरू झाला आहे. यामध्ये कामगाराने देखील निम्म्या पगारावर काम करण्याची तयारी दर्शवून कारखाना सुरू करण्यास हातभार लावला आज कारखाना असतील स्थिरस्थावर होत असला तरी अद्याप सूस्थित येणेस प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच यावेळी चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी सुचविले नुसार श्रमदान शिबीर आयोजन केले आहे. यामध्ये तालुक्यातील वेग वेळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच कारखाना आवारामध्ये वृक्षारोपण व सिडबॉल द्वारे आपल्या भागातील जंगलामध्ये रोपांची पेरणी केल्याने पुढील काळात झाडांची संख्या वाढून वातावरणामध्ये सुद्धा निर्माण करण्यास मदत होईल तसेच कारखाना सौंदर्यात देखील निर्माण होईल असे मत संचालक श्री केसरकर यांनी व्यक्त केले.यावेळी गडहिंग्लज येथील वृक्षमित्र आनंद पाटील यांनी कारखाना परीसर वृक्षारोपण कारखाना सौंदर्यात भर घालावी कारखाना स्थळावर वेगवेगळ्या फळांचे वृक्ष लावणे मुळे तीन ते चार वर्षाचे उत्पन्न देण्यास सुरुवात होईल कारखान्याच्या उत्पन्नात भर पडेल तसेच आंबोली व गोवा रस्त्यावर असलेल्या पर्यटकांना ये-जा होत असते अशावेळी कारखान्यातील फळांना किंमत येणार आहे. त्यासाठी शासनाकडून काही योजना लाभ घेऊन वृक्ष लागवडीस सुरुवात करावी असे सांगितले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन सुनील शिंत्रे यांनी आपल्या मनोगतामध्ये कारखान्यामार्फत घेण्यात आलेल्या श्रमदान शिबिरामध्ये प्राधान्याने सर्व कारखान्याचे कंपनी व्यवस्थापन करणार असून कारखाना व कॉलनी परिसराची स्वच्छता करणे तसेच दहा हजार वृक्ष लागवडीसाठी खड्डे मागणी व कारखाना कार्यक्षेत्रामध्ये वाटपासाठी एक लाख सीडबॉल तयार करणे धोरण आखले असून यासाठी लागणारा खर्च शासकीय निधी उपलब्ध करण्याचा मानस असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन श्री. शिंत्रे सांगितले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विशाल हुक्केरी,युवराज पोवार, महेश पाटील, सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते अमोल देसाई पप्पू गांधी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ टी. ए. भोसले, व्ही. एच, गुजर, व्ही. के. ज्योती, प्रकाश चव्हाण, शंकर आजरेकर, सुभाष भादवणकर, कामगार अध्यक्ष प्रकाश देसाई, युनियन पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्रमदान शिबीर संपन्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.