आजरा साखर कारखान्या वतीने श्रमदान शिबीर होणार. – १८ रोजी
( या उपक्रमात जास्तीत जास्त स्वयंसेवकाने भाग घ्यावा. चेअरमन श्री शिंत्रे यांचे अवाहन. )
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा सहकारी शेतकरी साखर कारखान्याच्या कामगार व कारखाना कार्यक्षेत्रातील स्वयंसेवक यांच्या वतीने कारखाना परिसर स्वच्छता व कारखाना परिसर वृक्षारोपण पावसा पूर्वीच्या पूर्वतयारीला बुधवार दि. १८/५/२०२२ रोजी सुरवात केली जात असल्याची माहिती चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी दिली.
कर्मचारी व लोकदान यांचे माध्यमातून कारखाना परिसरातील कचरा, झुडपे, गवत, निरुपयोगी कचरा गोळा करणे इ. कामाचा समावेश केला आहे. या श्रमदान कार्यक्रमात कर्मचारी, तरुन मंडळे, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भविष्यात झाडाची संख्या वाढण्यासाठी १०००० झाडे लावण्याचा मानस आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त स्वयंसेवक यांनी भाग घ्यावा. . असे आवाहन चेअरमन यांनी केले आहे.
