Homeकोंकण - ठाणेदिवसभरातील ठळक घडामोडी..१४ मे.

दिवसभरातील ठळक घडामोडी..१४ मे.

दिवसभरातील ठळक घडामोडी..१४ मे.

सह्याद्री. अपडेट.

▪️ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल, तर नवी मुंबई पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले

▪️शरद पवारांविरुध्द अभिनेत्री केतकी चितळची फेसबुक पोस्ट म्हणजे एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीला सुनावले

▪️सर्वांना भाषेचं भान असायला हवं, केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

▪️ लातूरच्या किनगाव गावाजवळील तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू, या घटनेत एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश असल्याची माहिती

▪️ मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, जवळपास दीड कोटींचे ड्रग्ज जप्त, या कारवाईत एनसीबीने एका व्यक्तीला केली अटक

▪️कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर, यापूर्वी ती ठरली होती ‘अन्नपूर्णा’ सर करणारी सर्वांत तरुण गिर्यारोहक

▪️ भारतात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज

▪️केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, गहू उत्पादन, सरकारी खरेदीबाबत सुधारित अंदाज पत्रक जारी

▪️ त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा, त्रिपुरामध्ये भाजपकडून पुन्हा आश्चर्याचा धक्का

▪️दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या एका इमारतीला भीषण आग, या आगीत २६ जणांचा मृत्यू तर १२ हून अधिक जखमी झाल्याची माहिती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.