Homeकोंकण - ठाणेजिल्हास्तरावरील नोकर भरती करताना प्रकल्पग्रस्तांच्या पाच टक्के जागांची भरती करावी. - आंबेऒहोळ...

जिल्हास्तरावरील नोकर भरती करताना प्रकल्पग्रस्तांच्या पाच टक्के जागांची भरती करावी. – आंबेऒहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

जिल्हास्तरावरील नोकर भरती करताना प्रकल्पग्रस्तांच्या पाच टक्के जागांची भरती करावी. – आंबेऒहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

आजरा. – प्रतिनिधी.

जिल्हास्तरावरील नोकर भरती करताना प्रकल्पग्रस्तांच्या पाच टक्के जागांची भरती करावी आंबेऒहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. जिल्हास्तरावरील नोकर भरती करताना प्रकल्पग्रस्तांच्या पाच टक्के जागांची भरती करावी याबाबत आरोग्य विभागासह विविध विभागाच्या रिक्त पदावरील भरती प्रक्रिया होणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर निवड समितीतर्फे ही भरती होणार आहे ही बाब स्वागतार्ह आहे. पण ही भरती होत असताना पाच टक्के प्रकल्पग्रस्तांच्या जागा भरण्यात याव्यात. प्रकल्पग्रस्त उमेदवारांची निवड करताना ज्येष्ठतेनुसार व पुनर्वसन विभागाकडील नोंदीनुसार करण्यात याव्यात अशी आम्हा प्रकल्पग्रस्तांची विनंती आहे. भरती प्रक्रिया ही पारदर्शी असेल याची आम्हाला आशा आहे. प्रत्येक विभागामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार प्राधान्याने व्हावा. अनेक जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना तसे प्राधान्य दिले जाते. सदर भरती प्रक्रिया विनाविलंब करण्यात यावी तसेच गेली बरेच वर्ष भरती नसल्याने अनेक प्रकल्पग्रस्त तरुणांचे दाखले ‘एजबार’ झाले आहेत त्यांना व्यवसायासाठी २५ लाख रुपये अनुदान सरकारने द्यावेत. किंवा बेरोजगार भत्ता म्हणून महिन्याला दहा हजार रुपये देण्यात यावेत अशी राज्य सरकारकडे आमची मागणी व विनंती असल्याचे निवेदन
ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, कोल्हापूर. तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना सदर निवेदनाच्या प्रती देण्यात आलेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.