Homeकोंकण - ठाणेध्यास स्नेहमेळाव्याचा उद्देश एक दिवसीय शाळेचा आनंद लुटण्याचा.( श्री शंकरलिंग. वि. म....

ध्यास स्नेहमेळाव्याचा उद्देश एक दिवसीय शाळेचा आनंद लुटण्याचा.( श्री शंकरलिंग. वि. म. व मडिलगे हायस्कूल माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न. )

ध्यास स्नेहमेळाव्याचा उद्देश एक दिवसीय शाळेचा आनंद लुटण्याचा.
( श्री शंकरलिंग. वि. म. व मडिलगे हायस्कूल माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न. )

आजरा प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील श्री शंकरलिंग विद्या मंदिर मडिलगे व मडिलगे हायस्कूल या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. ११ रोजी उत्साहात संपन्न झाला. प्राथमिक शाळेत सन. १९८९ – १९९६ सालात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी व हायस्कूल मधील १९९८ – १९९९ इयत्ता १० मधुन शिक्षण घेऊन बाहेर पडलेली सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा एकत्रितपणे साजरा एकाच व्यासपीठावर आमंत्रित करून जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेह मेळाव्यासाठी एकत्र येऊन सर्व माजी विद्यार्थी यांनी श्री सरस्वती देवीची मूर्ती चा जिर्णोद्धार करून सर्वांपुढे आदर्श निर्माण केला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मुर्ती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. स्नेहमेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव गुरव सर होते. होते. तर यावेळी गणपतराव आयवाळे यांच्या विद्यार्थीनी स्वागत गीत सादर केले.
शाळेतील त्या जुन्या आठवणींचा उजाळा देताना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपण शाळेत असल्याचा आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त करत सोशल मीडियाच्या माध्यमातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करणाऱ्या सुरेश पालकर, प्रवीण येसणे, सुनील कातकर, संगीता वागणेकर या सर्वांनी मोलाचा वाटा उचलला याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी यांचे आभार मानले. या स्नेहमेळावा कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच के. व्ही. येसने, माजी सभापती भिकाजी गुरव विद्यमान सरपंच गणपतराव आरळगुंडकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष जालिंदर येसणे या सर्व पाहुण्याने मागे वळून पाहणारा विद्यार्थी व जन्मभूमीची संस्कृती जपनुक करणारा विद्यार्थी असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात कौतुक केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या आठवणी सांगून सोहळ्याची रंगत वाढवली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गुरव सर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना आपल्या मुलांना शिक्षणात काहीही कमी पडू देऊ नका असे सांगत आयुष्य आनंदात जगा अशी शिकवण दिली प्राथमिक आदर्श शिक्षका कमल पाटील यांनी छडी लागे छम…छम – विद्या येई घम..घम चे महत्व पटवून दिले विजया परुळेकर व सुजाता नाईक ( चिटणीस ) यांनी आपल्या बहुमूल्य मार्गदर्शन माणुसकीची शिकवण दिली. तसेच विद्यार्थी घटवताना व इंग्रजी विषय शिकवताना शिस्तप्रिय असावेच लागते असे हेमंत बिरबोळे सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थी सह गजानन गोवेकर, रमेश कांबळे, सौ. विमल चौगुले, तानाजी पावले, सह सर्व विद्यार्थी शिक्षक गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांशी स्नेह भोजनाचा आस्वाद घेत आपल्या एक दिवशी शाळेचा आनंद लुटला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.